“पीसीएनटीडीए’चा 680 कोटींचा अर्थसंकल्प

– “पीसीएनटीडीए’ची 337 वी सभा
– संविधान भवन, औद्योगिक संग्रहालय, सुसज्ज हेलिपॅड, ओपन जीम

पिंपरी – पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) सन 2019-20 चा 680 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. 5 कोटी 27 लाख रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात भांडवली कामांसाठी 592 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. संविधान भवन, औद्योगिक संग्रहालय, सुसज्ज हेलिपॅड, उद्यानांमध्ये ओपन जिम ही यंदाच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्‌ये आहेत. येत्या दोन ते अडीच वर्षात 6 हजार घरांचा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीसीएनटीडीएची 337 वी सभा अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात सन 2019-20 चा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी सभेला सादर केला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान घाडगे यांनी हा अर्थसंकल्प तयार केला आहे. सभेमध्ये त्यावर चर्चा होवून तो संमत करण्यात आला. 679 कोटी 89 लाख 86 हजार रकमेचा हा अर्थसंकल्प असून त्यात 674 कोटी 62 लाख 61 हजार एवढा खर्च अपेक्षित आहे. 5 कोटी 27 लाख 25 हजार रुपयांची शिल्लक दर्शविण्यात आली आहे.

जमेच्या तपशीलामध्ये आरंभीची शिल्लक 502 कोटी 66 लाख दाखविण्यात आली आहे. महसुली जमा 38 कोटी 14 लाख रुपये तर भांडवली जमा 139 कोटी 8 लाख रुपये आहे. जमेच्या बाजूमध्ये विविध पेठांमधील भूखंड विक्रीतून 100 कोटी, अतिरिक्त अधिमूल्य आणि हस्तांतरण शूल्कातून 17 कोटी 53 लाख, विकास निधी व व्याजातून 8 कोटी 42 लाख जमा अपेक्षित धरण्यात आली आहे. ठेवींवरील व्याजातून 26 कोटी, दंडापोटी 10 कोटी 80 लाख आणि ठेकेदारांच्या ठेवीमधून 2 कोटी 86 लाख रुपये जमा अपेक्षित आहे.

खर्चाच्या बाजूला महसुली खर्चासाठी 82 कोटी 13 लाख तर भांडवली खर्चासाठी 592 कोटी 49 लाख एवढी रक्कम प्रस्तावित आहे. महसुली खर्चामध्ये कर्मचारी आस्थापना खर्च 14 कोटी 20 लाख तर आकस्मिक खर्च 65 कोटी 92 लाख रूपये आहे. तर भांडवली खर्चामध्ये विविध विकास कामांसाठी 127 कोटी 56 लाख, उद्यान, पर्यावरण, सुधारणा व शहरी वनीकरणासाठी 21 कोटी 82 लाख रुपये, बांधकाम व इतर कामांसाठी 413 कोटी 65 लाख आणि भूसंपादनासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विकास कामांमध्ये प्रामुख्याने खुल्या प्रदर्शन केंद्रासाठी 44 कोटी 81 लाख, पेठ क्रमांक 30 व 32 मधील गृहयोजनेसाठी 17 कोटी, पेठ क्रमांक 6 मधील गृहयोजनेसाठी 18 कोटी 50 लाख, पेठ क्रमांक 12 मधील गृहयोजनांसाठी अनुक्रमे 125 कोटी आणि 120 कोटी आणि वाल्हेकरवाडी येथील गृहयोजनेसाठी 40 कोटी, रस्त्याच्या कामांसाठी 35 कोटी, विद्युतविषयक कामांसाठी 22 कोटी रुपये आणि इतर स्थापत्य विषयक कामांसाठी 40 कोटी 55 लाख रूपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील मुख्य तरतुदी
पेठ क्रमांक 6, 12, 30, 32 येथे गृहप्रकल्प – 325 कोटी
खुले प्रदर्शन केंद्र बांधणे – 44. 81 कोटी
औद्योगिक संग्रहालय, विरंगुळा केंद्र, ओपन जिम बांधणे – 8 कोटी
पेठ क्रमांक 11 येथे संविधान भवन व विपश्‍यना केंद्र – 5 कोटी
चिंतामणी चौक ते पॉवर हाऊस 24 मीटर रस्ता रुंदीकरण – 5 कोटी
पेठ क्रमांक 25 मध्ये सांस्कृतिक भवन बांधणे व दुरूस्ती – 5 कोटी
औंध – रावेत रस्त्यावर साई चौकात दोन समांतर उड्डाणपूल – 5 कोटी
पेठ क्रमांक 5 आणि 8 येथे सौर उद्यान – 1 कोटी
आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रामध्ये अद्ययावत हेलीपॅड – 1 कोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)