“पीव्हीपीआयटी’त टेक्‍नोथॉन उत्साहात

 

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.1 – डिप्लोमा ,डिग्री आणि इंजिनियरिंग पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या तंत्र आविष्काराला प्रोत्साहन देण्यासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी बावधन येथे टेक्‍नोथॉन 2020 (हाईटेक फार्मिंग) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तीन दिवसांच्या या कार्यक्रमाचे यंदा आठवे वर्ष आहे. यावेळी हायटेक फार्मिंग ही या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना होती. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही विविध ठिकाणांहून साधारण 3000 विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन उद्योजक हनुमंतराव गायकवाड यांच्या हस्ते झाले. तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्‌घाटन मराठी सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे व संस्थेचे सचिव गिरीराज सावंत यांच्या हस्ते झाले.
यावेळी हनुमंतराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात काम करताना जिद्द आणि चिकाटीने काम करून सर्वोत्तम येण्याचा प्रयत्न करावा , असा कानमंत्र दिला. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. शशिकांत थिटे, प्रा.डॉ. पी.पी .विटकर, प्राचार्य डॉ. सी. एम.सेदानी, अपर्णा खरे, विकास पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी अजिंक्‍य लोणकर यांनी मनोगत व्यक्‍त केले.
या कार्यक्रमात राज्याच्या विविध भागांतून इंजिनिअरिंग, कृषी विद्यापीठ व कॉलेजमधील विविध प्रोजेक्‍ट सादर केले. यावेळी प्रामुख्याने युजीकॉन 2020, रोबो रेसलिंग, डावजींग, स्टार्टअप प्रोजेक्‍ट यांसारख्या अनेक स्पर्धांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. जे.एस.पी.एम चे संस्थापक आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यान कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले.  सूत्रसंचालन मानसी मोरे, सिद्धेश चासकर यांनी केले. प्रा.डॉ.रवि सोरटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी समन्वयक प्रा.डॉ. रविराज सोरटे, प्रा.डॉ. बी.के. सरकार, डॉ. एन. कर्डेकर, प्रा. स्मिता यादव, प्रा. पी. बोराडे, प्रा. पी. मूलमुले प्रा.नवनाथ बागल यांनी विशेष परिश्रम घेतले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.