पीवायसी आणि व्हेरॉक यांच्यात होणार विजेतेपदासाठी लढत

पहिली पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक क्रिकेट स्पर्धेत

पुणे: पीवायसी हिंदु जिमखाना संघाने महाराष्ट्र क्रिकेट संघटना 1 संघाचा तर व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने पुना क्‍लब संघाचा पराभव करत पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून अंतीम फेरीत पीवायसी आणि व्हेरॉक यांच्यात होणार विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत साहिल चुरीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदु जिमखाना संघाने महाराष्ट्र क्रिकेट संघटना 1 संघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना साहिल चुरी, आदित्य लोंढे, सिध्देश विर व यश माने यांच्या लक्षवेधी गोलंदाजीपुढे महाराष्ट्र क्रिकेट संघटना 1 संघ केवळ 35.5 षटकात 119 धावांतच गारद झाला.

120 धावांचे लक्ष्य अमेय भावे व सिध्देश विर यांनी केलेल्या 122 चेंडूत 95 धावांच्या भागीदारीसह पीवायसी संघाने केवळ 25.2 षटकात 1 गडी गमावत 120 धावा करून पुर्ण केले. अमेय भावेने नाबाद 64 तर सिध्देश विरने 40 धावा केल्या. यावेळी 21 धावांत 5 गडी बाद करणारा साहिल चुरी सामनावीर ठरला.

तर, उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत ऍलन रोड्रीग्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने पुना क्‍लब संघाचा 24 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. अतितटीच्या झालेल्या लढतीत शेवटपर्यंत लढा देत व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने विजय संपादन केला. पहिल्यांदा खेळताना सौरभ नवलेच्या अर्धशती खेळीच्या बळावर व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने 38 षटकात सर्वबाद 161 धावा केल्या. अलान रोड्रीग्सने नाबाद 30 धावा करून सौरभला सुरेख साथ दिली. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चंद्रकांत सरोजच्या 51 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत व अलान रोड्रीग्स, साईगणेश जीदाप व ओम भोसले यांच्या भेदक आण्इ माफक गोलंदाजीपुढे पुना क्‍लब संघाचा डाव केवळ 42.1 षटकात सर्वबाद 137 धावांत गारद झाला. यावेळी नाबाद 30 धावा व 18 धावात 3 बळी घेणार ऍलन रोड्रीग्स सामनावीर ठरला.

सविस्तर निकाल:
महाराष्ट्र क्रिकेट संघटना 1- 35.5 षटकांत सर्वबाद 119 (व्यंकटेश दराडे 31, विवेक इशरवल 22, रिषी अग्राहर 20, साहिल चुरी 21-5, आदित्य लोंढे35-2,) पराभूत वि पीवायसी हिंदु जिमखाना- 25.2 षटकांत 1 बाद 120 (अमेय भावे नाबाद 64, सिध्देश विर 40, विवेक इशरवल 36-1).
व्हेरॉक क्रिकेट अकादमी: 38 षटकांत सर्वबाद 161 (सौरभ नवले 55, हर्षवर्धन पाटील 20, किरण मोरे 20, ऍलन रोड्रीग्स नाबाद 30, दर्षीत लुंगड 27-3, ओमकार मोहोळ 23-2, मुकुंद गायकवाड 29-2,) वि.वि पुना क्‍लब – 42.1 षटकांत सर्वबाद 137 (चंद्रकांत सरोज 51, ओमकार मोहोळ 30, मुकुंद गायकवाड 19, ऍलन रोड्रीग्स 18-3, साईगणेश जीदाप 28-2, ओम भोसले 8-2).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)