पीमएपीसाठी प्रवासी रस्त्यावर ताटकळत

चिंबळी- खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील चाकण पररिसरात औद्योगिक क्षेत्रातील कुरुळी, मोई, चिंबळी, निघोजे येथील वाढती लोकसंख्या आणि सतत होणारी प्रचंड वाहतूककोंडी, दळणवळणाची अपुरी सुविधा, तसेच अवैध प्रवासी वाहतूक यामुळे या परिसरातील ज्येष्ठ नागरिक प्रवासी हैराण झाले आहेत. त्यातच या ठिकाणावरील बसथांबे एका जागेवर नाहीत, तसेच थांब्यावर निवाराशेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रस्त्यावर थांबूनच प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागते. उन-वारा-पावसाचा सामना त्यांना करावा लागत आहे. यासाठी एकच ठिकाण ठरवून बसथांबे करावेत, तसेच तेथे निवारा शेड उभारावी अशी मागणी कुरूळी, चिंबळी परिसरातील प्रवाशांच्या वतीने पंचायत समितीचे सदस्य अमर कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संचालक पांडुरंग बनकर यांनी केली आहे. या परिसरात वाढत्या औद्योगिक वसाहतींमुळे नागरिक आणि प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढले असून ते पीएमपीवर अवलंबून आहेत. त्यातच आळंदीफाटा, कुरूळी आणि चिंबळी फाटा येथे पुणे-नाशिककडे आणि भोसरीकडे जाणाऱ्या प्रवाशांना निवाराशेड नसल्यामुळे भर उन्हात बसची प्रतीक्षा करत थांबावे लागत आहे. त्यातच ज्या ठिकाणी बस थांबेल त्या ठिकाणी प्रवाशांना पळत जाऊन बस पकडावी लागते, त्यामुळे लहान मुले, जेष्ठ नागरिक, महिलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)