पीडीएफ फाईल्स अशाप्रकारे करा मोफत एडिट

अनेकांना हे माहित नसत की पीडीएफ फाईल्स एडिट करता येतात. बऱ्याच जणांना पीडीएफ फाईल्समधील लिहिलेल्या आशयामध्ये बदल करयाचा असतो. मग तो करता येतो की नाही, जर येत असेल तर कसा करायचा अशा अनेक अडचणी येतात. म्हणूनच आज आपण पीडीएफ फाईल कशी व कोठे एडिट करता येईल हे पाहणार आहोत.

पीडीएफ फाईल्य एडिट करण्याचे अनेक अॅप्स आहेत. त्यापैकी सर्वांनाच माहित असलेले ऐडोब अॅक्रोबैट डीसी पीडीएफ एडिटर हे एक आहे. हे अॅप पीडीएफ एडिटिंगसाठी सर्वात चांगले समजले जाते पण याचा वापर करण्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र काही असे पर्याय आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही मोफत पीडीएफ फाईल्स एडिट करू शकता. यावेळी आपण त्याच पर्यायांना जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने मोफत एडिट करणे शक्‍य आहे.

एडिट पीडीएफ फॉर फ्री ऑनलाईन (Edit PDF for free Online)

हा पर्याय अॅड्रॉईड, आयओएस, विडोंज, लाइनक्‍स आणि मॅकओएस यांना सर्पोट करतो. आयओएसच्या मदतीने हे अॅप्लिकेशन गूगल क्रोम ब्राउजरमध्ये चांगले सप्रोट करते. सफारी ब्राउजरवर काटी टूल्स व्यवस्थित वापरता येत नाहीत.

1. पीडीएफ एसकेफ (PDF Escape) हा पर्याय निवडा.
2. यानंतर अनुक्रमे फ्री ऑनलाईन-अपलोड पीडीएफ टू पीडीएफएसकेफ वर क्‍लिक करा त्यानंतर हवी ती पीडीएफ फाईल ड्रग करा किंवा चूज फाइल वर क्‍लिक करा.
3. आता तुम्हाला जी फाईल एडिट करयाची ती पीडीएफ फाईल निवडा.
4. त्यानंतर काही सेंकदाच्या प्रोसेसनंतर फाईल एडिटीगसाठी उपलब्ध होईल.डावीकडील पॅनलवर तुम्हाला टूल्स दिसतील. या पॅनलमध्ये टेक्‍स्ट, ब्लॅक व्हाइट बॉक्‍स ( डिलीक्‍ट किंवा हाईड करणे साठी), फॉर्म फिल्ड करणे इत्यादी पर्याय असतील. या पर्यायाच्या सहाय्याने पीडीएफ फाईल मधील टेक्‍स्ट एडिट करा.

पीडीएफ फाईलला वर्ड मध्ये कनव्हर्ट करणे आणि एडिट करणे

1. पीडीएफ टू वर्ड कनव्हर्टर साईटवर जा.
2. अपलोड ए फाईल टू कनव्हर्ट या पर्यायावर क्‍लिल करा.
3. तुम्हाला हवी ती पीडीएफ फाईल सिलेक्‍ट करा.
4. काही मिनिटात तुमची फाईल वर्डमध्ये कनव्हर्ट होईल, त्यानंतर ती फाईल डाउनलोड करा.
5. मग वर्ड फाइलमध्ये टेक्‍स्ट एडिट करा व परत ती फाईल वर्ड टू पीडीएफ कनर्वट करा.

इंक्‍सकॅपे किंवा लिबर ऑफिस ड्रॉ (Inkscape or Libre Office Draw)

जर तुम्हाला पीडीएफ फाईलचे एडिटिंग डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वर करायचे असेल तर इंक्‍सकॅपे किंवा लिबर ऑफिस ड्रॉ हे अॅप्लिकेशन वापरू शकता. दोन्हीपण फ्री वेक्‍टर ड्रॉइंग अॅप आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही पीडीएफ फाईल्स अगदी सहज एडिट करू शकता. त्यासाठीच्या स्टेप्स खालीलप्रमाणे –

1.फाईल – ओपन करा.
2. पीडीएफ फाईल सिलेक्‍ट करा.
3. यानंतर तुमची फाईल टेक्‍स्ट एडिटीग स्वरूपात ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या फॉन्टमध्ये एडिट करा.
4. तुमच एडिटीग झाल्यानंतर फाईल एक्‍सपोर्ट ऍज पीडीएफ पर्याय निवडा. त्यानंतर फाईल तुमच्या डेस्काटॉपमध्ये हव्या त्या ठिकाणी सेव्ह (जतन) करा.

अशाप्रकारे तुम्ही पीडीएफ फाईल्स फ्री मध्ये एडिटिंग करू शकता.

– स्वप्निल हजारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)