पीककर्ज अभियानासाठी सहकार खाते गावोगावी

दि. 15 मे ते 30 जून दरम्यान जिल्हा बॅंक घेणार शाखानिहाय मेळावे
अकोले- राज्य शासनाच्या ध्येयधोरणानुसार चालू वर्षीचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतक-यांना पीक कर्जाची तात्काळ उपलब्धता व्हावी म्हणून शासनाच्या सहकार खात्यानेच कंबर कसली आहे.यासाठी संपुर्ण नाशिक विभागात तालुका स्तरीय समित्या स्थापन करुन ग्रामपातळीवर वेळोवेळी बैठका घेऊन शेतक-यांपर्यंत पीक कर्ज अभियानाची माहिती प्रसारित करणारे काम सुरु आहे. त्यासाठी सुलभ शेती कर्ज अभियान यशस्वी करुन लक्षांक पूर्ण करण्याचे निर्देश नाशिक विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत.
शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ योजने अंतर्गत निर्धारित केलेल्या अटीनुसार पात्र थकबाकीत असणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली असल्याने अशा पात्र शेतकऱ्यांना नियमित पीक कर्ज पुरवठा करणे हा योजनेचा मुख्य उद्देश असल्याने सुलभ पीककर्ज अभियान यशस्वी करण्याचा चंग सहकार खात्याने बांधला आहे.
अभियान यशस्वी करण्यासाठी 15 मे ते 30 जून या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखानिहाय ठिकाणी कर्जमेळावे आयोजित करुन कर्जपुरवठा करण्याचा उद्देश आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी गाव, तालुका व जिल्हा पातळीवर समित्यांचे गठन करण्यात आले. ठिकठिकाणच्या मेळाव्यात शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मेळाव्यास जिल्हा बॅंक संचालक, सेवा संस्थेचे संचालक मंडळ, संस्थेचे सभासद, शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी या सर्वांना माहिती देण्याचे निर्देश विभागीय सहनिबंधक यांनी दिलेले आहेत.

सुलभ पीक कर्ज अभियानाची उद्दिष्टे–
कर्जमाफी योजनेत निरंक झालेल्या कर्जदारांना तात्काळ नव्याने पीककर्जाची उपलब्धता करून देणे, शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कार्यक्षेत्रातील राष्ट्रीयीकृत बॅंका, ग्रामीण बॅंका, व्यापारी बॅंका यांची माहिती देणे, अडचणीतल्या संस्थाच्या कर्जमागणी याद्या सचिवांमार्फत राष्ट्रीयकृत बॅंकांना पोहचविणे. समितीने पीक कर्जाची प्रभावाने जनजागृती करुन कार्यवाही करणे. राष्ट्रीयीकृत बॅंकांमार्फत कर्ज प्रकरण करणेसाठी सचिवांची मदत घेणे ही अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)