सर्वोच्च न्यायालयाने आज ‘पीएम नरेंद्र मोदी’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाविरोधात दाखल केलेली जनहित याचिका ८ एप्रिल रोजी सुनावणीसाठी घेण्याचा निर्णय घेतल्याने ५ एप्रिलला प्रदर्शित होणार असलेल्या या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे.
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार आपण चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकलत असल्याची माहिती देताना म्हणाले की, “पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट उद्या म्हणजे ५ एप्रिलला प्रदर्शित होणार नाहीये. पण हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल मात्र आता मी तुम्हाला तारीख सांगणार नसून तो तुमच्यासाठी सस्पेन्स असणार आहे. विरोधक या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करत आहेत, मात्र आम्हाला हा चित्रपट कधी प्रदर्शित करावा याचा आम्हाला योग्य नादाज आहे”
Omung Kumar, 'PM Narendra Modi' director: Suspense! The film isn't releasing tomorrow, not on 5 April. But it'll be done soon, you'll get to know. We don't want to tell you the date now. Opposition had come forward, tried things. It's late but we know what date to release it on. pic.twitter.com/pMHVCp0o8g
— ANI (@ANI) April 4, 2019