पीएमपी रस्त्यातच बंद पडल्याने प्रवाशांचे हाल

चिंबळी -पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नियमित धावणाऱ्या बसेस भोसरी ते राजगुरूनगर व मनपा भवन ते महाळुंगे, चाकण या मार्गावर बसेस सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून बंद पडतात. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांचे हाल होतात.

शुक्रवारी (दि 22) सकाळी 11 वाजून वीस मिनिटांनी मोशी-भोसरी रत्स्यावर गंधर्वनगरी येथील चढावर भोसरी ते राजगुरूनगर ही 258 क्रमांकाची बस पिकअप न घेतल्याने चढावरच बंद पडली असल्याने भर उन्हात प्रवासी वर्गाना बसमधून खाली उतरण्यात आले. त्यामुळे शाळेच्या व कॉलेजच्या विद्यार्थ्याचे तसेच कामगार वर्गाचे व भाविकांच्या हाल झाले, असा या वेळोवेळी सतत बस बंद पडल्यामुळे पीएमपीएमएल खात्याचा नाही मनस्ताप सहन करावा लागतो. ती या खात्याने या महामार्गावर नादुरुस्त बसेस सोडव्यात अशी मागणी प्रवासी वर्गानी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.