“पीएमपी’वर स्थायीची नाराजी कायम

पिंपरी – पीएमपीएमएलच्या संचलनात पिंपरी-चिंचवड महापालिकचा 40 टक्के वाटा आहे. मात्र, अंमलबजावणीत या शहराला सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याची तक्रार करत, पिंपरीतील बंद केलेले पीएमपीएमएलचे विभागीय कार्यालय पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारी (दि.25) झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला.

सभापती ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. पिंपरी-चिंचवड शहरात धावणाऱ्या पीएमपीएमएल बस संचलनाचे नियोजन पुण्यातील मुख्य कार्यालयातून केले जाते. बस नियोजित वेळेत मार्गांवर न धावणे, बसच्या खेपा रद्द होणे तसेच पीएमपीएलबाबतच्या विविध तक्रारी करण्यासाठी पुण्यात जावे लागते. त्यामुळे शहरातील पीएमपीएमपीएल संदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पिंपरीत पीएमपीएमलचे विभागीय कार्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला आहे.

पीएमपीएमएलला प्रतिमहा अग्रीम स्वरुपात संचलन तुट व सवलतीच्या पासापोटी सात कोटी 50 लाख रुपये अदा करण्यात आले. स्थायीच्या सभेत पीएमपीएमएलच्या सेवेच्या दर्जाबाबत चर्चा झाली. पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएलच्या कमी प्रमाणात धावतात. गाड्यांचे नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आणि बस संचलनाचे काम अधिक प्रभावीपणे होण्यासाठी पूर्वीप्रमाणे पीएमपीएमएलचे महामंडळ मुख्यालय क्रमांक दोनचे कार्यालय पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात कार्यालय सुरु करण्यात यावे. त्याच्या नियंत्रणासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे पीएमपीएमएल प्रशासन आणि महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यात समन्वय साधण्यासाठी या कार्यालयात पीएमपीएमएलचे कर्मचारी संजय कुटे यांची नेमणूक करण्यात यावी, असे या प्रस्तावात नमूद केले आहे.

पुढील आठवड्यात कार्यशाळा
पिंपरी-चिंचवड शहरातील कोणत्या मार्गांवर किती पीएमपीएमएल बस धावतात. किती बस नादुरुस्त झाल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी पुढील आठवड्यात चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहात एक कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. या कार्यशाळेत पीएमपीएमएलच्या अध्यक्षांकडून सर्व माहिती घेतली जाणार आहे. या बैठकीला नगरसेवक व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)