पीएमपीला वर्षभरात 658 कोटींचे उत्पन्न

863 कोटी 14 लाखांचा खर्च झाल्याने 204 कोटींची संचलन तूट

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) 2017-18 आर्थिक वर्षात 658 कोटी 52 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले. मात्र, वर्षभरात 863 कोटी 14 लाखांचा खर्च झाल्याने सुमारे तब्बल 204 कोटी 62 लाखांची संचनल तूट झाली आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नामध्ये 20 कोटी 48 लाख 59 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरुवारी पीएमपीएमएलच्या स्वारगेट येथील मुख्य कार्यालयात पीएमपीएमएलचा 2017-18 चा आर्थिक ताळेबंद तसेच नफा-तोटा पत्रकाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी संचालक सिध्दार्थ शिरोळे, महाव्यवस्थापक विलास बांदल, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय माने आदी उपस्थित होते. वर्षभरात महामंडळाच्या स्वमालकीच्या गाड्यांचे 1 कोटी 38 लाख किलोमीटरचे संचलन झाले आहे. तर, खासगी भागीदारीतील बसचे संचलन 53 लाख 83 हजार, भाडेतत्त्वावरील बसचे संचलन 56 लाख 53 हजार झाले आहे. महामंडळ सातत्याने तोट्यात सुरू असून हा तोटा भरून काढण्यासाठी तसेच उत्पन्न वाढीसाठी सुसूत्रीकरणावर भर दिला जाणार आहे. तसेच, कमी उत्पन्नाच्या मार्गावरील बसफेऱ्या घटवून जादा उत्पन्न देणाऱ्या मार्गावर बस संचलनात वाढ केली जाणार असल्याचे यावेळी शिरोळे यांनी सांगितले.

भाडेवाढीचा विचार नाही
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधनदरवाढ होत असल्याने भाडेवाढीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, पीएमपीएमएलकडून प्रवाशांना कमी दरात प्रवास उपलब्ध करण्यासाठी कायम प्रयत्न सुरू असून एवढ्यात भाडेवाढीचा विचार नसल्याचे यावेळी शिरोळे यांनी सांगितले. यामुळे प्रवाशांना पुढील काही कालावधीसाठी दिलासा मिळाला आहे.

यावर्षीचा थोडक्‍यात आढावा
– गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात 20 कोटी 48 लाखांनी वाढ
– वाहतूक महसुलामध्ये 8 कोटी 48 लाखांची वाढ
– यंदाच्या आर्थिक वर्षांत महामंडळाच्या खर्चात 14 कोटी 66 लाख 28 हजारांची वाढ
– वेतन खर्चात 18 कोटी 25 लाख रकमेची वाढ
– सातत्याने होणाऱ्या इंधनदरवाढीमुळे महामंडळाला इंधन खर्चात 25 कोटी 65 लाखांचा जादा भुर्दंड
– बस देखभाल दुरुस्तीमध्ये 9 कोटी 87 लाख रकमेने वाढ
– खासगी बस ठेकेदारांवरील खर्च 39 कोटींनी कमी झाला आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)