पीएमडीटीए वार्षिक मानांकन यादी : रुमा गायकैवारीला दोन गटात अव्वल मानांकन 

अव्वल आठ खेळाडूंना शिष्यवृत्ती
पुणे – पुणे जिल्हा टेनिस संघटनेने (पीएमडीटीए) 2017-18 या वर्षासाठी जाहीर केलेल्या वार्षिक मानांकन यादीत रुमा गायकैवारीला 12 व 14 वर्षांखालील अशा या दोन्ही गटात अव्वल मानांकन देण्यात आले आहे.
पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी वार्षिक मानांकन यादी जाहीर केली. 2017 या वर्षात एकूण 14 कनिष्ठ जिल्हा मानांकन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय अरुण साने मेमोरियल हौशी लीग टेनिस स्पर्धा तसेच शशी वैद्य मेमोरियल आंतर क्‍लब टेनिस अजिंक्‍यपद टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

आठ वर्षांखालील गटात सक्षम बन्साली, 10 वर्षांखालील मुलांच्या गटात आरुष मिश्रा, 10 वर्षांखालील मुलींच्या गटात श्रावणी देशमुख, 12 वर्षांखालील मुलांच्या गटात ईशान देगमवार, 12 व 14 वर्षांखालील मुलींच्या गटात रुमा गायकैवारी तर 14 वर्षांखालील मुलांच्या गटात नुपुर चौधरी यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे. प्रत्येक वयोगटातील अव्वल 8 खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये रकमेची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याशिवाय अरुण साने मेमोरियल शिष्यवृत्ती व अरुण वाकणकर मेमोरियल पदक देण्यात येणार असल्याचे ताम्हाणे यांनी सांगितले. वार्षिक संमेलन आणि खेळाडूंना रोख रकमेचे पुरस्कार प्रदान करून खेळाडूंचे मनोबल वाढवणारी पीएमडीटीए ही महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा टेनिस संघटना आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वार्षिक मानांकन यादी – 
आठ वर्षांखालील गट – 1. सक्षम बन्साली, 2. मनन अगरवाल, 3. अर्जुन परदेशी, 4. शार्दूल खवले, 5. समीहन देशमुख, 6. सूर्या काकडे, 7. आर्यन कीर्तने, 8. अन्वय सोवनी, दहा वर्षांखालील मुले – 1. आरुष मिश्रा, 2. अर्णव पापरकर, 3. सक्षम बन्साली, 4. अर्जुन कीर्तने, 5. शिवांश कुमार, 6. अभिराम निलाखे, 7. कार्तिक शेवाळे, 8. अद्विक नाटेकर, दहा वर्षांखालील मुली – 1. श्रावणी देशमुख, 2. सिया प्रसादे, 3. क्षिरीन वाकलकर, 4. मेहेक कपूर, 5. देवांशी प्रभुदेसाई , 6. रिया बकरे, 7. रितिका मोरे, 8. तनिषा साने, बारा वर्षांखालील मुले – 1. ईशान देगमवार, 2. राधेय शहाणे, 3. अर्णव कोकणे, 4. सुधांशू सावंत, 5. वेद पवार, 6. पार्थ देवरूखकर, 7. अर्णव पापरकर, 8. आर्यन हूड, बारा वर्षांखालील मुली – 1. रुमा गायकैवारी, 2. पूर्वा भुजबळ, 3. कश्वि राज, 4. एंजल भाटिया, 5. श्रावणी देशमुख, 6. माही शिंदे, 7. चिन्मयी बागवे, सानिका लुकतुके, चौदा वर्षांखालील मुले – 1. नुपुर चौधरी, 2. इशान गोदभरले, 3. आदित्य जावळे, 4. अनमोल नागपुरे, 5. श्रेयश कुमार, 6. राधेय शहाणे, 7. आर्यन कोटस्थाने, 8. वेद पवार, चौदा वर्षांखालील मुली – 1. रुमा गायकैवारी, 2. माही शिंदे, 3. समा शहापूरकर, 4. ऐश्वर्या कैलाजे, 5. अग्रिमा तिवारी, 6. एंजल भाटिया, 7. ईशिका राजपूत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)