‘पीएमआरडीए’ विकास आराखड्यासाठी सिंगापूरचे सहकार्य

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यास (डीपी) सिंगापूर सरकार सहकार्य करणार आहे. तसेच प्राधिकरणाच्या क्षेत्रातील विकासासाठी आवश्‍यक पायाभूत सोई-सुविधांच्या अंमलबजावणी आणि औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने सिंगापूर शासनाच्या संस्थेसोबत करार करण्यासंदर्भात शुक्रवारी बैठक झाली.

या बैठकीस पालकमंत्री गिरीश बापट, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते आणि सिंगापूर शासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंगापूर शासनाच्या प्रतीनिधीसोबत सप्टेबर 2017 मध्ये संबधीत विषयावर चर्चा केली. शुक्रवारी पुण्यात झालेल्या बैठकीत प्राधिकरणाकडून तयार करण्यात येत असलेल्या विकास आराखडा प्रक्रियेत सिंगापूर शासनाचा सहभाग करण्याबाबत चर्चा झाली. त्याचप्रमाणे करारनाम्याच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली.

सिंगापूर शासनाच्या प्रतीनिधीसमवेत चाकण एमआयडीसी येथील क्षेत्रात कंटेनर पोर्ट व लॉजिस्टीक पार्क या प्रकारच्या नियोजित प्रकल्पाकरिता जागा पाहणी करण्यात आली. सदर बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने शहरी विकास, पायाभूत सोई-सुविधा, औद्योगिक विकासप्रकल्प अंमलबजावणी वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने सिंगापूर शासनाचे योगदान महत्वपूर्ण ठरेल, असे मत पालकमंत्री बापट यांनी व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)