पीएफ खात्यात दुरुस्ती करताना…

खासगी कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वेतनात कपात होऊन एम्प्लॉई प्रॉव्हिडंड फंड (ईपीएफ) मध्ये जमा केला जातो. काहींच्या पीएफ स्टेटमेंटमध्ये धारकाचे नाव किंवा जन्म तारीख हे आधारमध्ये नमूद असलेल्या बाबींशी मेळ खात नाही. अशा स्थितीत फंड काढताना अडचणींचा सामना करावा लागतो.

सरकारच्या मते, 8.38 कोटींहून अधिक पीएफ खात्यात वेतनदाराच्या जन्मतारखा चुकीच्या आहेत तर 11.07 कोटी खात्यात वेतनदाराच्या वडिलांच्या नावाचा समावेश नाही. म्हणून भविष्यातील अडचण टाळण्यासाठी आधार आणि पीएफ खाते यांच्यात सुसंगता आणण्याचा विचार करावा. यासाठी सर्वात अगोदर पीएफ फंडमध्ये आपले नाव आणि जन्मतारीख आधारशी मिळती-जुळती आहे की नाही, हे पाहा. जर त्यात काही फरक असेल तर ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. ही बाब अवघड नाही. या गोष्टीतील बदल ऑनलाइनही करता येतो. पीएफ खात्याच्या प्रोफाईलमध्ये दुरुस्ती करण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करावी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चार गोष्टी आवश्‍यक 

– अॅक्‍टिव्ह युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन)

– ईपीएफओच्या संकेतस्थळाची जुजबी माहिती

– आधार क्रमांक

– आपला अर्ज ईपीएफओला पाठवा. ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये बदल करण्यापूर्वी आधारमधील माहिती पुन्हा एकदा पडताळून घ्या. कदाचित आपला आधार नंबर अगोदरच व्हेरीफाय झालेला असू शकतो आणि तसा संदेशही आपल्या मोबाइलवर येऊ शकतो. आधारमधील विवरणात पुन्हा संशोधन करता येत नाही. याचाच अर्थ असा की, आपल्याला पीएफ खात्यात काहीच बदल करायचा नसून अगोदर आधार कार्डमध्ये दुरुस्ती करावी लागेल. त्यानंतर मग पीएफ खात्यातील दुरुस्ती करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागेल.

पीएफचे विवरण असे अपडेट करा 

पीएफ खात्यातील विवरणात दोन प्रकारे बदल करता येतो. एक कर्मचाऱ्याच्या पातळीवर आणि दुसरे कंपनीच्या पातळीवर. त्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे. ईपीएफओमध्ये मेंबर यूनिफाइड पोर्टलवर जाऊन दिलेली माहिती आधारनुसार देण्याचा प्रयत्न करा. या बदलाची माहिती कंपनीलाही द्यावी. सिस्टिम हे बदलाचे अवलोकन करेल आणि ते आधारशी लिंक करेल. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर हा अर्ज कंपनीला ट्रान्सफर केला जाईल. त्यानंतर कंपनी हा अर्ज ईपीएफओला पाठवेल. शेवटी ईपीएफओ त्यात गरजेनुसार बदल करेल.

ऑफलाइन सुधारणा करताना: जर एखादा व्यक्ती इंटरनेटच्या मदतीशिवाय पीएफच्या विवरणपत्रात सुधारणा करू इच्छित असेल तर त्यासंबधी फॉर्म कर्मचारी आणि कंपनीकडून भरल्यानंतर ईपीएफओच्या कार्यालयात पाठवता येतो.

– मेघना ठक्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)