पीएनबीची कर्जवसुलीसाठी गांधीगिरी मोहीम

  दर महिन्याला 150 कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्यासाठी बॅंकेचे प्रयत्न

नवी दिल्ली -पंजाब नॅशनल बॅंकेने आता कर्ज बुडविणाऱ्याना धडा शिकण्यासाठी नवा मार्ग अवलंबिला आहे. बॅंकाचे कर्जवसुली विभागातील अधिकारी कर्ज परत न करणाऱ्याच्या कार्यालयाबाहेर घराबाहेर फलक घेऊन शांतपणे बसणार आहे. या मोहिमेमुळे महिन्याला 150 कोटींचे कर्ज वसूल होण्याची बॅंकेच्या व्यवस्थापनाला अपेक्षा आहे.

नीरव मोदी प्रकरणानंतर या बॅंकेने स्वत:ला सावरण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. या प्रकरणातील सर्व जबाबदाऱ्या बॅंकेने पार पाडण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर बॅकेने तांत्रिक दृष्टीने सर्वोत्तम व्हायचे ठराविले आहे. आता बॅंकेने आपला मोर्चा कर्जवसुलीकडे वळविला आहे. सरकारने बॅंकांना कर्जवसुलीसाठी बरेच अधिकार दिले आहेत. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकही त्यांना मदत करीत आहे. यासाठी बॅंकेने गांधीगिरी मोहीम ही हाती घेतली आहे.

त्यासाठी 1144 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. कर्ज परत करण्याचे टाळणाऱ्यांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर काही कर्मचारी शांतपणे बसून राहणार आहेत. त्यामुळे कर्ज बुडवणाऱ्यांवर दबाव येईल आणि ते चर्चेसाठी तयार होतील असे बॅंक व्यवथापनाला वाटते. यातून महिन्याला 100 ते 150 कोटी रुपयाची कर्जवसुली होण्याची शक्‍यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एकीकडे बॅंक थकलेले कर्ज विविध मार्गांचा अवलंब करून वसूल करण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे योग्य कंपन्यांना योग्य कामासांठी आवश्‍यक तो कर्ज पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेत आहे. बॅंकेने भारताच्या आर्थिक विकासात आतापर्यंत महत्वाची भूमिका अदा केली आहे. आगामी काळातही कर्ज परतफेड करण्याची क्षमता आणि इच्छा असणाऱ्यांना बॅंक आवश्‍यक तो कर्जपुरवठा करत राहणार असल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी या विषयावर बोलताना सांगितले.

कर्ज परतफेड टाळणाऱ्यांची यादी जाहीर

क्षमता असूनही कर्ज परत न करणाऱ्या 1084 लोकांची यादी बॅंकेने अगोदरच जाहीर केली आहे. त्याचबरोबर अशा 260 लोकांचे फोटो जाहीर केले आहेत. त्याचबरोबर मोठे कर्ज परत न केलेल्या 150 लोकांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. बॅंकने 37 जणांच्या विरोधात पोलीस तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याचबरोबर बॅंकेने क्रेडिट एजन्सीची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आता कर्ज वसुलीसाठी मदत तर मिळणार आहेच त्याचबरोर नवे कर्ज देतानाही मदत होणार आहे. सध्या बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 12.11 टक्‍के म्हणजे 57519 कोटी रुपये आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)