पिसावरे विद्यालयात चिमणी दिन साजरा

भोर- पिसावरे माध्यमिक विद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला. यावेळी पक्षी निरीक्षण मंडळाच्या सदस्या शुभांगी बरदाडे यांनी मार्गदर्शन केले. चिमण्यांची शाळा उपक्रमांतर्गत विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षीमित्र संतोष दळवी होते. यावेळी रविशा बरदाडे, स्वरुपा खोपडे, सिद्धी बांदल, दुर्गा बरदाडे, मुख्याध्यापक संतोष ढवळे, विश्वास निकम, धनंजय कोठावळे, आशालता सुतार उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात चिमण्यांसाठी घरटी, वॉटर फिडर, ग्रेन फिडर तयार करण्यासंदर्भात कार्यशाळा आयोजित केली होती.

कार्यशाळेत 70 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये पक्षीमित्र मनिष शिंदे, साहिल चौधरी, जय बांदल, यश खाटपे, सिद्धेश खाटपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी “चिमणी व मी’ या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे संयोजन आचार्य अत्रे विद्यार्थी मंडळाने केले होते. सूत्रसंचालन स्नेहल प्रधान यांनी केले तर अंकिता बरदाडे आभार हिने मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.