पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर शासनाने घातली ३ महिन्यांची बंदी

नवी दिल्ली : जून २०१८ पर्यंत पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवर शासनाने निर्बंध आणले आहेत. स्वस्तात होणारी आयात रोखून स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी शासनाने पिवळ्या वाटाण्यावर ५० टक्के आयात शुल्क वाढवले होते.

सर्वाधिक डाळ उत्पादनात भारत हा जगातील सर्वांत मोठा देश आहे. तर २०१८-१९ मध्ये डाळींच्या उत्पादनाचे उद्दिष्ट २४ मिलियन टन आहे. २०१७-१८ च्या २३.९५ मिलियन टनांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे.

असे असले, तरी ‘ठरवून दिलेल्या दिनांकापूर्वी करण्यात आलेली नोंदणी आणि येणाऱ्या डाळीवर या निर्बंधाचा कोणताही परिणाम होणार नाही’ असे याबद्दलच्या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)