‘पिरीएड: एंड ऑफ सेन्टेन्स’ला ऑस्करला नामांकन

ऑस्करसाठी नामांकन जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. भारतातल्या “पिरीएड- एंड ऑफ सेन्टेन्स’ ला ऑस्करचे नामांकन मिळाले आहे. अक्षय कुमारचा “पॅड मॅन’ हा ज्यांच्या कामावर आधारलेला होता, त्या अरुणाचलम मुरुगंथम यांनी या सिनेमात प्रत्यक्ष काम केले आहे. याशिवाय या सिनेमाचा विषयही “पॅडमॅन’सारखाच आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांनी जी कामे करू नयेत, असे जे विधीनिषेध पाळले जात असत. त्याचा परामर्श या सिनेमात घेतला गेला आहे.

“डॉक्‍युमेंटरी शॉर्ट सब्जेक्‍ट’ श्रेणीमध्ये “पिरीएड…’ची निवड पाच पर्यायांमधून करण्यात आली आहे. या श्रेणीमध्ये “ब्लॅक शीप’, “एंड गेम’, “लाईफबोट’ आणि “अ नाईट ऍट द गार्डन’ हे अन्य चार सिनेमे होते. “लंचबॉक्‍स’ आणि “मसान’सारख्या सिनेमांची निर्मिती करणाऱ्या गुनीत मोंगा आणि शिख्या एन्टरटेनमेंटने “पिरीएड…’ची निर्मिती केली आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांनी अनेक गोष्टी करणे निषिद्ध मानले जाते. त्या सगळ्या अपसमजांच्या विरोधात उभी राहणाऱ्या एका महिलेची ही कथा आहे. अरुणाचलम मुरुगंथम यांच्या कामाविषयी तिला समजते. त्यांच्या कामाने प्रभावित होते आणि वैद्यकीय बाजूच्या आधारे हे अपसमज खोटे ठरवले, अशी सिनेमाची कथा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रायका झेन्टाब्ची या इराणी अमेरिकन डायरेक्‍शनने दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असली, तरी सिनेमाची सर्व पार्श्‍वभुमी भारतीय भूमीतली आहे. लॉस एंजेलिसमधील ओकवूड स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या गटाने “द पॅड प्रोजेक्‍ट’ नावाने एक संघटना सुरु केली आहे. त्या संघटेनेच्या वतीने या सिनेमाची निर्मिती केली गेली आहे. केवळ 26 मिनिटांच्या या सिनेमामध्ये उत्तर प्रदेशातील एका गावात सॅनिटरी पॅड मशिन बसवण्यापर्यंतची छोटी कथा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने भारतातील आणखी एका सिनेमाला ऑस्कर नामांकन मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)