पिरंगुट स्कूलमधील 153 विद्यार्थिनींना सायकल वाटप

पिरंगुट- मुलींची शैक्षणिक गरज ओळखून खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदार संघातील विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले आहे. यामुळे मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाही. मुलींनी चांगला अभ्यास करून पालकांचे नाव उज्वल करावे, असे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रा. सविता दगडे यांनी सांगितले. खासदार सुळे यांच्या माध्यमातून टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पिरंगुट येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट इंग्लिश स्कूल मधील 153 विद्यार्थिनींना सायकल मिळाल्या आहेत. त्याच्या वाटपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सभापती राधिका कोंढरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, माजी सभापती महादेव कोंढरे, रविंद्र कंधारे, कोमल वाशिवले, सरपंच मंदा पवळे, भोर विधानसभा अध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा सरचिटणीस सुनील वाडकर, तालुका सरचिटणीस माऊली कांबळे, कालिदास गोपालघरे, माजी उपसरपंच रामदास पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. महादेव कोंढरे म्हणाले, 1642 सायकली वाटप तालुक्‍यात करण्यात आले आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे काम सुळेंच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन ए. एम. खराडे, प्रास्ताविक प्राचार्य एस. बी. लाडके तर पर्यवेक्षिका डी. एस. गायकवाड यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)