पित्याची मुलीला अमानुष मारहाण

पिंपरी – दुचाकी दिली नाही या कारणावरून वडिलांनी मुलीला लोखंडी सळईने अमानुषपणे मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 25) सायंकाळी सातच्या सुमारास चिंचवड मधील केशवनगर येथे घडला.

मोनिका सुरेश माने (वय-28, रा. काकडे टाऊनशिप, केशवनगर, चिंचवड) या मुलीने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरेश विठ्ठल माने (वय-60) याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोनिका यांच्याकडे ऍक्‍टिव्हा दुचाकी आहे. ही दुचाकी त्यांचे वडील सुरेश यांनी मागितली. ती न दिल्याने सुरेश यांनी मोनिकाला भिंतीवर ढकलले. तसेच लोखंडी सळईने पाठीवर, पोटावर अमानुषपणे मारहाण केली. यामध्ये मोनिकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्‍चर झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)