‘पिच फिक्‍सिंग’च्या आरोपांचा तळापर्यंत जाऊन छडा लावू – रिचर्डसन 

लंडन – खेळपट्टीचे स्वरूप बदलण्याच्या स्वरूपावरून अल जझिराने केलेल्या स्टिंगबाबतची चौकशी आयसीसीने सुरू केली असून लवकरच आम्ही त्या वृत्तवाहिनीने केलेल्या आरोपांच्या तळापर्यंत जाऊन त्या प्रकरणाचा छडा लावू, असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी सांगितले. या प्रकरणी आयसीसीने अल जझिरा वाहिनीकडे संपूर्ण फूटेजची मागणी केली असून संबंधित फूटेज देण्यास त्या वृत्तवाहिनीने नकार दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

हॅरिसन यांनी केलेल्या ‘क्रिकेट्‌स मॅच फिक्‍सर्स’ या 54 मिनिटांच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंगमध्ये तब्बल चार कसोटी सामने फिक्‍स झाल्याचे आढळून आले. त्यापैकी तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताचा समावेश होता. हे स्टिंग ऑपरेशन अल जझिरा वाहिनीने केले आहे. ज्या सामन्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे, त्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 26 ते 29 जुलै 2017 दरम्यान गॅलेमध्ये, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 16 ते 20 मार्च 2017 दरम्यान रांचीत आणि भारत आणि इंग्लंड यांच्यात 16 ते 20 डिसेंबर 2016 दरम्यान चेन्नईत खेळल्या गेलेल्या लढतींचा समावेश आहे. गॅले व चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता तर रांचीमध्ये खेळला गेलेला सामना अनिर्णीत राहिला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आम्ही वाहिनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून त्यांनी आम्हाला सहकार्य करण्यास किंवा ते संपूर्ण फूटेज देण्यास नकार दिला आहे, अशी माहिती आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी मंडळाचे अध्यक्ष ऍलेक्‍स मार्शल दिली. यावर डेव्हिड रिचर्डसन म्हणाले की लवकरच आम्ही वाहिनीच्या अधिकाऱ्यांना भेटणार असून आमच्या प्रयत्नांना यश येईल अशी अपेक्षा आहे. रिचर्डसन पुढे म्हणाले की, लोक जेव्हा क्रिकेट सामन्यातील फिक्‍सिंगबाबत बोलतात तेव्हा आम्ही आरोपांचा संपूर्ण तपास करतो. आम्ही कोणत्याही आरोपांकडे दुर्लक्ष करत नाही. त्यामुळे संबंधित आरोपांच्या तळापर्यंत जाऊन आम्ही दोषींना कशा प्रकारे शिक्षा करण्यात येईल याचा विचार करत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)