सांगवी – पिंपळे सौदागर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पिंपळे सौदागर ड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्लास्टिक कचरा संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे.
पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात मोर रिटेल शॉपिंग सेंटर येथे हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. प्लास्टिक बॅग, थर्माकोल आदी वस्तू येथे संकलित केल्या जाणार आहेत. या केंद्राचे उद्घाटन सहाय्यक आरोग्य अधिकारी बेंडाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव, आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई, आरोग्य सहाय्यक दिपक माकर, पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील, रामा मंजाळ, संतोष कांबळे, सिद्धार्थ सातपुते, मिलिंद पोत्रे, अमित कोष्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्वच्छ व सुंदर पिंपरी-चिंचवड मोहिमेतील एक स्तुत्य उपक्रम महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरु केल्याने परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. शासनाने प्लस्टिकचा वापर व साठवणुकीवर बंदी आणल्याने पर्यावरण व परिसरातील स्वच्छता वाढणार असल्याचे बेंडाळे यांनी यावेळी सांगितले. पिंपळे सौदागरमधील नागरिकांनी पुढील काळात आपल्या घरातील प्लस्टिक कचरा व थर्माकोल रस्त्यावर न फेकता संकलन केंद्रात जमा करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा