पिंपळे जगताप येथे ठेक्‍यासाठी दमदाटी करणाऱ्यांवर गुन्हा

शिक्रापूर- शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावांमध्ये कंपनीच्या ठेक्‍याच्या वादातून तसेच ठेके मिळविण्यासाठी होणाऱ्या दमबाजी यांतून अनेक वाद होत आहेत. अशाच प्रकारे पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील कंपनीच्या बसचा ठेका मिळविण्यासाठी दमबाजी करणाऱ्यांनावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबात युनी पॉल इंडिया कंपनीचे व्यवस्थापक ओमकार अशोक कुलकर्णी (रा. आलंकापूरम सोसायटी पुणे, आळंदी रोड, वडमुखवाडी, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दाखल फिर्यादीनुसार, पिंपळे जगताप येथील युनी पॉल इंडिया कंपनीत शिवस्वराज्य हॉलिडेज ट्रान्सपोर्ट कंपनीचा बसचा ठेका असून त्यांच्या बसमधून कामगार ने-आण करण्याचे काम केले जाते. 28 जुलै रोजी दुपारच्या सुमारास कंपनीच्या सुट्टीनंतर कामगार बसमधून घरी जात असताना सचिन कुसेकर, नितीन कुसेकर आणि सुरेश शेलार हे तेथे आले. त्यांनी बस अडवत “या कंपनीच्या ट्रान्सपोर्ट आणि बसचा ठेका आम्हाला द्या नाहीतर, कोणाची बस चालू देणार नाही, असे म्हणत बस अडवून ठेवली. त्यानंतर बसचालकाने कंपनी व्यवस्थापक ओमकार कुलकर्णी यांना सांगितले. त्यानंतर कुलकर्णी आणि आदींनी त्या तिघांची समजूत काढली आणि आपण कंपनी मुख्य व्यवस्थापकांशी चर्चा करु, असे सांगितले असता देखील त्या तिघांनी दमदाटी करत बस कामगारांसह अडवून ठेवत दमदाटी केली. याबाबत युनी पॉल इंडिया कंपनीचे व्यवस्थापक ओमकार अशोक कुलकर्णी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी सचिन राजेंद्र कुसेकर, नितीन राजेंद्र कुसेकर, सुरेश अंबादास शेलार (रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पुनाजी जाधव हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)