पिंपळे खालसात लावला पिंजरा

शिक्रापूर- पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथे अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असताना काही ठिकाणी पाळीव जनावरांचा देखील बिबट्याने फडशा पाडला असून बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने वनविभागाने आज (शनिवारी) त्याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.
पिंपळे खालसासह परिसरातील मुखई, धामारी, जातेगाव खुर्द, हिवरे यांसह आदी भागांमध्ये वारंवार बिबट्याचे दर्शन होत होते, अनेकदा बिबट्याने जनावरांचा फडशा पाडला तर काही ठिकाणी नागरिकांवर देखील हल्ले चढविले आहे. तर दोन दिवसापासून काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला असल्याच्या घटना घडल्या त्यांनतर वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांना घटनेची माहिती मिळताच त्याच्या आदेशानुसार वनविभागाच्या वनरक्षक सोनल राठोड, वनमजूर आनंदा हरगुडे यांनी पिंपळे खालसा येथे जाऊन येथील येथील सरपंच राजाराम धुमाळ, सतीश धुमाळ, पप्पूशेठ धुमाळ तसेच आदींसह पाहणी केली असता येथील शेतामध्ये व उसामध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले, त्यावेळी बिबट्याच्या पावलांचे ठसे असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असता बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली. त्यांनतर वनविभागाने देखील गांभीर्याने लक्ष देऊन आज (शनिवारी) सकाळी पिंजरा उपलब्ध करत पिंजरा लावला आहे. तर यावेळी नागरिकांनी रात्रीच्या सुमारास एकटे बाहेर पडू नये, शेतामध्ये जाताना मोठ्याने आवाज करत जावे, रात्रीच्या सुमारास लाईट सुरू ठेवावी, शेतामध्ये जाताना एकटे जाऊ नये, फटाके वाजवावेत असे आवाहन देखील वनरक्षक सोनल राठोड यांनी केले आहे. जातेगाव या ठिकाणी बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने अनेक जनावरे बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत त्यामुळे बिबट्याची दहशत वाढत चालली असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी या भागातील शेतकरी व नागरिक करत आहे. तर बिबट्याला पकडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून बिबट्याचा बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)