पिंपळगाव जोगा धरणातून तिसरे आवर्तन

ओतूर-जुन्नर तालुक्‍यात पिंपळगावजोगा धरणातून कालव्याद्वारे तिसरे आवर्तन सोडण्यास सुरुवात बुधवारी (दि. 25) सकाळी आठपासून 50 क्‍यूसेकने करण्यात आली. तसेच रात्री 100 क्‍युसेकने आणि गुरुवारी (दि. 26) सकाळी आठ वाजता 200 क्‍युसेकने सोडण्यात आल्याची माहिती पिंपळगाव जोगा धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक एस. एम. बेनके यांनी दिली.
जुन्नर तालुक्‍यातील कुकडी प्रकल्पा अंतर्गत पाच धरणांपैकी एक असलेल्या पिंपळगाव जोगा धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 8.42 टीएमसी असून मृत साठा 4.42 टीएमसी आहे. पाण्याचा विसर्ग सुरू करताना धरणात एकूण पाणीसाठा 0.88 टीएमसी उपयुक्‍त पाणीसाठा होता आर्वतनामुळे जुन्नर तालुक्‍यातील डिंगोरे, ओतूर, पिंपरी पेंढार, वडगाव आनंद, आळे, राजुरी, बेल्हे तसेच पारनेर तालुक्‍यातील पाडळी आळे, अळकुटी, लोणी मावळा, वडझिरे या गावातील जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. तीव्र उन्हामुळे विहीर आणि पाझर तलावातील पाणी झपाट्याने कमी होऊ लागले होते. लाभक्षेत्रातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे ऐन पाणी टंचाईच्या काळात पाणी सोडल्याने शेती पिकांना दिलासा मिळणार आहे. या पाण्यामुळे दोन्ही तालुक्‍यातील अनेक छोटे बंधारे, गावतळी भरली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)