पिंपरी-चिंचवड @ 90.87 %

  • बारावीचा निकाल ः यंदाही मुलीच सरस, 94.58 टक्‍के विद्यार्थीनी उत्तीर्ण

पिंपरी – पिंपरी- चिंचवड शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी उत्कृष्ट असे यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेत शहरातील नव्वद टक्‍क्‍याहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी पिंपरी-चिंचवड शहराने विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यालाही निकालाच्या बाबतीत मागे टाकले आहे. 90 चा आकडा पार करवण्यात मुलींचे मोठे योगदान आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल 90.87 टक्के इतका लागला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल 94.58 टक्के, तर मुलांचा निकाल 87.79 टक्के इतका लागला आहे. बुधवारी दुपारी निकाल जाहीर करण्यात आला त्यानंतर सर्वच शाळांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत होते. प्रथमच बारावीच्या परिक्षेला बसलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 16 हजार 357 विद्यार्थ्यापैकी 14 हजार 864 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. उतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या 7 हजार 18, तर मुलांची संख्या 7 हजार 846 इतकी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान धाक-धुक मनात घेऊन निकाल पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी आणि चिंता या निकालाने दूर झाली आणि काही क्षणातच आनंदाचे वातावरण पसरले. कित्येक पालक आज सुट्टी घैऊन घरी थांबले होते. मुलांच्या सोबतीने वर्षभर कष्ट करणाऱ्या पालकांचे चेहरेही सुखावले होते.
येथे पुन्हा निराशा
मागील वेळी अपशय आल्याने पुन्हा परिक्षेला बसलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली. पुन्हा परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मात्र 38.35 टक्के लागला आहे. पुन्हा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांमध्ये मात्र या निकालाने निराशा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)