पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव

पिंपरी– चिंचवड महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या 11 तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 7 अधिकारी व कर्मचा-यांचा आज सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुस्तक, गुलाब पुष्प व स्मृतिचिन्ह, तसेच सेवाउपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माजी उपहापौर शैलजा मोरे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्या शर्मिला बाबर, चंदा लोखंडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाच्या सचिव चारुशिला जोशी, नाथा मातेरे आदी उपस्थित होते. महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये मुख्य लिपिक ताराचंद वायकर, वायरलेस ऑपरेटर रामदास कोलते, आरोग्य निरिक्षक नागनाथ पारसी, लिपिक सुशिला कलापुरे, वीज पर्यवेक्षक रमेश तेलमोरे, मुकादम प्रकाश खोपडे, बाळासाहेब चव्हाण, रखवालदार ज्ञानेश्वर मुदगल, दिनेशकुमार मिश्रा, मजूर सुर्यकांत सकाटे, शकुंतला गायकवाड तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्यांमध्ये आर्टीस्ट कम फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर, स्टाफ नर्स माधूरी जोशी, वॉर्ड बॉय चंडीदास आगज्ञान, आरोग्य कर्मचारी माया सौदागर, चित्राबाई वेंटम, छबुबाई भालके, दिंगबर बेंढारी यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)