पिंपरी गावातही पंतप्रधान आवास योजना

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयासमोर 110 सदनिका उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी 13 कोटी 91 लाख खर्च आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. पंतप्रधान आवास अंतर्गत शहरात विविध योजना राबविण्यात येत आहेत. शहरातील दहा ठिकाणच्या गृहप्रकल्पात एकूण 99 हजार 458 सदनिका बांधण्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. चऱ्होली, चोविसावाडी, रावेत येथील प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे. त्या पाठोपाठ दापोडीतील सिद्धार्थनगर, गुलाबनगर, महात्मा फुलेनगर, लिंबोरे वस्ती, जयभीमनगर येथे झोपडपट्टी पुनवर्सन योजना (एसआरए) राबविण्यात येणार आहे. त्यात एकूण 6 हजार 693 सदनिका लाभार्थींसाठी उभारल्या जाणार आहेत. त्यास शहर सुधारणा समितीने 3 जानेवारीला मंजुरी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयासमोरील ज्ञानेश्‍वरीनगरीला लागून असलेल्या सर्व्हे क्रमांक 225, 227 (आरक्षण क्रमांक 159) येथील एकूण 1 हजार 500 चौरस मीटर जागेत नवा गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. पंतप्रधान आवास योजनेतील या प्रकल्पात एकूण 110 सदनिका बांधल्या जाणार आहे. इमारत उभारणीचा एकूण खर्च 13 कोटी 91 लाख इतका आहे. प्रतिचौरस फूट बांधकामाचा खर्च 2 हजार 18 इतका आहे. एका सदनिकेची किंमत 11 लाख असणार आहे. त्यात केंद्राचा दीड लाख, राज्य शासनाचा 1 लाख आणि लाभार्थ्यांचा 8 लाख 50 हजार इतका हिस्सा असणार आहे. पालिका या जागा निःशुल्क उपलब्ध करून देणार आहे. तसेच, प्रकल्पासाठी लागणाऱ्या सध्याच्या रेडिरेकनरनुसार जागेची किंमत, बांधकाम परवानगीचे विकास शुल्क, प्रीमिअमचे शुल्क आदी पालिका लाभार्थ्यांकडून घेणार नाही.

बांधकाम खर्च, सल्लागार, 2 टक्के इस्टाब्लिश चार्जेस, 5 टक्के भाववाढ असे एकूण 13 कोटी 91 लाख खर्च या प्रकल्पास येणार आहे. या सदस्य प्रस्तावाला स्थायी समितीने ऐनवेळी मंजुरी दिली आहे. सर्वसाधारण सभेच्या अंतिम मंजुरीनंतर त्याचा डीपीआर तयार करून केंद्र व राज्याची मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्पाची कार्यवाही सुरू होणार आहे.

रस्ते बाधितांचे प्रकल्पात पुनवर्सन
पिंपरीगाव व कॅम्पातील रस्ते अरूंद आहेत. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. सणोत्सवात ही समस्या अधिक उग्र बनते. त्यामुळे स्थानिक व्यापारी, रहिवाशांसह वाहन चालक व पादचारी हैराण झाले आहेत. येथील रस्त्यांचे रूंदीकरण करून प्रशस्त रस्ते करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. बाधित कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेत सदनिका मिळणार आहेत, असा दावा सभापती ममता गायकवाड यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)