पिंपरी कॅम्पातील अतिक्रमणावर “वॉच’

 

पिंपरी – पिंपरी कॅम्पातील अतिक्रमणाचा मुद्दा सोडविण्यासाठी व्यावसिायकांच्या दोन संघटना आमने-सामने ठाकल्या आहेत. त्यामुळे संवदेनशील झालेला हा मुद्दा सोडविण्यासाठी आता प्रशासनाने यात गांभिर्याने लक्ष घातले आहे. त्याकरिता आता पिंपरी कॅम्पात महापालिका कर्मचारी आणि पोलिसांचे पथक कायमस्वरूपी तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी कॅम्पात पथारीधारकांचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार कॅम्पातील व्यावसायिकांनी केली आहे. स्थानिक नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची भेट घेत, निवेदन सादर केले होते. त्यानंतर टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी आयुक्‍त हर्डीकर यांची भेट घेत, या व्यापाऱ्यांनी आपल्या निर्माण झाली होती.

आयुक्‍त हर्डीकर यांनी दोन्ही बाजूचे दुकानांसमोर ठेवलेल्या विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना कॅम्पातून चालणेदेखील मुश्‍किल झाल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्पातील व्यावसायिकांच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न चिघळण्याची शक्‍यता म्हणणे घेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कॅम्पातील अतिक्रमणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी कॅम्पात फेऱ्या घालणारे कायमस्वरुपी पथक नेमण्यात येणार असल्याचे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. त्याकरिता पोलीस पथकही तैनात कले जाणार आहे.

व्यापारी आणि पथारी हातगाडीचालक अशी दोन्ही शिष्टमंडळे भेटली असून त्यांची बाजू जाणून घेतली आहे. भाजीमंडईत नोंदणीकृत आणि बिगरनोंदणीकृत हॉकर्स आहेत. तर, अनेक व्यापाऱ्यांनी दुकानांसमोरील जागा पैसे देऊन भाड्याने दिल्या आहेत. काही व्यापारी दुकानातील माल रस्त्यावर ठेऊन जागा ताब्यात घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी कायमस्वरुपी पथक तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे अनधिकृत हॉकर्स बसणार नाहीत. तसेच वाहतूक कोंडी देखील कमी होईल.
– श्रावण हर्डीकर, आयुक्‍त, महापालिका.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here