पिंपरीत चाबुकस्वार-बनसोडे यांच्यात जोरदार घमासान

– दुसर्‍या फेरीअखेर चाबुकस्वार 2125 मतांनी आघाडीवर

पिंपरी  – पिंपरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांच्यात जोरदार घमासान सुरु आहे. दुसर्‍या फेरीअखेर चाबुकस्वार 2125 मतांनी आघाडीवर आहेत.

पिंपरी विधानसभा मतदार संघात आजी-माजी आमदारांमध्ये लढत आहे. भाजप-शिवसेना महायुतीचे अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह 18 उमेदवार रिंगणात आहेत. पिंपरीत 50.17 टक्के मतदान झाले आहे. 1 लाख 77 हजार 387 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे.

बालेवाडीतील मतमोजणी केंद्रावर सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीद्वारे पिंपरीच्या मोजणीला सुरुवात झाली. 499 टपाली मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममवरील मतांची मोजणी सुरु झाली. या मतदार संघात 399 केंद्र आहेत. प्रत्येक टेबलवर 20 केंद्र याप्रमाणे 20 टेबलांवर मोजणी होत आहे. मतमोजणीच्या 20 फेर्‍या होणार आहेत. दुसर्‍या फेरीअखेर चाबुकस्वार यांना 10 हजार 372 तर अण्णा बनसोडे यांना 8 हजार 247 मते मिळाली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.