पावसाळ्यात वीज खंडीत होऊ देऊ नका – आमदार लांडगे

पिंपरी – पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होता कामा नये. आत्ताच नियोजन कण्यात यावे. भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. काही ठिकाणाचे ट्रान्सफर मओव्हरफ लोड झाले असून ते बदलण्यात यावेत. नवीन ग्राहकांना त्वरित वीज मीटर उपलब्ध करुन देण्यात यावेत. धोकादायक वायर अंडरग्राऊंड करण्यात याव्यात, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

भोसरी विधानसभा विद्युत समितीची आढवा बैठक भोसरीत पार पडली. आमदार व समितीचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता तथा समितीचे सह अध्यक्ष मदन शेवाळे, नगरसेवक व समितीचे सदस्य राहुल जाधव, कुंदन गायकवाड, राजेंद्र लांडगे, विकास डोळस, सागर गवळी, उत्तम केंदळे, नगरसेविका व सदस्या सारिका बोऱ्हाडे, सोनाली गव्हाणे, अश्विनी बोबडे, सुवर्णा बुर्डे, उपविभागीय अभियंता बापूराव भरणे, ग्राहक प्रतिनिधी मच्छिंद्र दरवडे, परिक्षित वाघेरे, निलेश भालेकर, राहुल शिंदे, सम्राट भागवत, अशासकीय प्रतिनिधी सुहास ताम्हाणे बैठकीला उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कोणती कामे झाली आहेत. 2018-19 मध्ये कोणती कामे केली जाणार आहेत, त्याचा आराखडा तयार करणे. चोविसवाडी, काटे कॉलनी या परिसरातील विद्युतविषय तक्रारी येत आहेत. त्यांचे वेळेत निराकरण करण्यात यावे. जाधववाडी येथे नवीन वीज बिल भरणा केंद्र सुरु करण्यात यावे. भोसरी, लांडे चौकातील ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाले आहेत. नवीन ग्राहकांना वीज मीटर उपलब्ध करुन देण्यात यावेत. मोशी शाखा कार्यालयाला मीटर द्यावेत. प्राधिकरण, शिवाजीनगर येथील पोल काढणे. पीएमटी चौकातील ट्रान्सफॉर्मर चालू करणे. सॅन्डवीक कॉलनी, भोसरी गावठाण मधील ओव्हरहेड ते अंडरग्राऊंड करणे. रामनगर मधील ट्रान्सफॉर्मर बदलण्यात यावा. रस्त्यावरील मीटर पोल शिफ्ट करावेत, अशा सूचना करण्यात आल्या.

महावितरणकडे मागण्यांची जंत्री
दिघी, ज्ञानेश्वर पार्क येथील ओव्हरहेड वायर बदलणे. सावंतनगर कमान ते ममता स्वीट होम चौकातील पोल शिफ्टींग करण्यात यावेत. आदर्शनगर, ज्ञानेश्वर पार्क, गजानन महाराज नगर, गणेशनगर परिसरातील वायर अंडरग्राऊंड करणे. चऱ्होली ताजणेमळा येथील सर्व्हिस वायर व्यवस्थित करण्यात याव्यात, किंवा अंडरग्राऊंड करावे. निगडी, सेक्‍टर 22 येथे नवीन पोल टाकण्यात याव्यात, अशा मागण्यांची जंत्री महावितरणकडे सादर करण्यात आली. तसेच समिती सदस्यांच्या भागातील तक्रारींचा आढावा घेण्यात आला.

विविध योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामामुळे वीज हानी कमी होऊन वीज ग्राहकांना सुरळीत व योग्य दाबाने वीज पुरवठा करणे, तसेच नवीन येणाऱ्यांना वीज पुरवठा देणे शक्‍य झाले आहे. डीपीडीसी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे अजून वीज गळती कमी होऊन योग्य दाबाने वीज पुरवठा करणे. नवीन मागणी असलेल्या वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणे शक्‍य होणार आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)