पावसाच्या विश्रांतीचा खरीप हंगामाला फटका

File photo

पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता : जनजागृतीसाठी पाठविले “एसएमएस’

पुणे: गेल्या महिनाभरापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याने त्याचा परिणाम पिकांवर होणार असून यंदा खरीपाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होईल, असा अंदाज कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. पावसा अभावी पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहणीमध्ये आढळून आले आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा ऊस आणि भात पिकांना होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात पावसाला दमदार सुरूवात झाली होती. जूनमध्ये नाही पण, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा खरीपाचे उत्पादन वाढेल, अशी शक्‍यता व्यक्त होत होती. पण, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने जी विश्रांती घेतली ती अद्याप ही कायम आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचे खरीपाचे गणित कोलमडणार आहे. विशेष करून मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर खरीपाच्या नुकसानीचा अंदाज आहे.
कृषी विभागाने दिलेल्या अहवालानुसार राज्यात पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, माढा या तालूक्‍यातील सुमारे 12 हजार हेक्‍टरवरील ऊस क्षेत्रावर हुमणी रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. याशिवाय सोयाबीन पिकांवर पाने खाणारी अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भावर आढळून आले आहे. याशिवाय भात पिकांवर पावसाअभावी गादमाशी,निळे भुंगरे, पिवळ्या खोडकिडी व कडाकोरपा मानमोडी या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. मूग आणि उडीदवर मावा या किडीचा प्रादर्भाव आढळून आला आहे.

गेले दिड महिन्यापासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अनेक िंठकाणी खरीप पिकांवर रोगाचा व किडीचा प्रार्दभाव झाल्याचे आढळून आले आहे. भात शेतीवर जी किड आढळली आहे ती, तर पाऊस नसल्यानेच पसरली आहे. याशिवाय उसाचे क्षेत्रसुद्धा मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. ऊस उत्पादन यंदा विक्रमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. कारण उसाचे क्षेत्र वाढले होते, पण आता क्षेत्र वाढले तरी, उत्पादन मात्र कमी होणार आहे.

याबाबत आता कृषी विभागाने सुद्धा पिकांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत गावागावांमध्ये जाऊन पिकांची माहिती घेण्यात येत आहे. या शिवाय शेतकऱ्यांना पिक सर्वेक्षणाचे सल्ले देण्यात येत आहेत. किड व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसुद्धा करण्यात येत आहे. त्यादृष्टीने गेल्या आठवडाभरात सुमारे 7 लाख 85 हजार शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. एकंदरीत राज्यात यंदा खरीप पिकांचे नुकसान होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे आता आर्थिक नुकसानीचे सुद्धा सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)