पावसाची विश्रांती, अनेक दिवसानंतर सूर्यदर्शन

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) – गेल्या अनेक दिवस सुरू असलेल्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. कित्येक दिवस ढगाळ हवामान पाहणाऱ्या नागरिकांना अखेर सूर्यदर्शन झाले. दरम्यान, रविवारी सुट्टीचा दिवशीच पावसाने विश्रांती घेतल्याने कास, ठोसेघर, भांबवलीकडे जाण्यासाठी सातारासह पर्यटकांची गर्दी वाढली होती. यामुळे या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या. कासचा मोसम सुरू झाला नसला तरी भांबवली धबधबा तसेच कास तलाव, तसेच तेथून पुढे तापोळा परिसरातील निसर्गसौंदर्य पाहण्याला पर्यटकांची विशेष पसंत दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)