पावसाअभावी भात पिके पिवळी पडली

शेतकरी चिंतातूर : पंचनामे करण्याची मागणी

टाकवे बुद्रुक – दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने आंदर-मावळातील शेतकरी चिंतेत पडला आहे. पाणी नसल्याने भात पिके पिवळी पडली आहेत. जमिनीला भेगा पडल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टाकवे, घोणशेत, कचरेवाडी, साई, फळणे भागांत पावसाचे प्रमाण कमी झाला. येथील शेतकरी पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. कोळंब, इंद्रायणीचे पीक मोठ्या प्रमाणात येथे घेतात. काही दिवस पाऊस न पडल्यास शेतकरी मोठ्या संकटात सापडू शकतो. कृषी अधिकाऱ्यांनी आंदर-मावळ भागांत पंचनामे करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू शिंदे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)