पालेभाज्यांची आवक वाढली

संग्रहित छायाचित्र

पुणे – मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्या प्रमाणात मागणी असल्यामुळे सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल 75 हजार जुडींनी तर, मेथीची 20 हजार जुडींनी वाढली आहे. गेल्या रविवारी 1 लाख 75 हजार जुडी कोथिंबिरीची आवक झाली होती. ती आज अडीच लाख जुडी झाली. तर, मेथीची गेल्या आठवड्यात 80 हजार जुडी आवक झाली होती. ती आज 1 लाख जुडी झाली. घाऊक बाजारात कोथिंबिर, मेथीच्या जुडीला अनुक्रमे 300 ते 500 आणि 400 ते 600 रूपये भाव मिळत आहे. दोन्ही भाज्यांची किरकोळ बाजारात 8 ते 10 रूपये जुडी भावाने विक्री होत आहे. उर्वरित सर्व पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 300-500, मेथी : 400-600, शेपू : 200-500, कांदापात : 500-1000, चाकवत : 400-500, करडई : 300-400, पुदिना : 300-500, अंबाडी : 300-400, मुळे : 500-800, राजगिरा : 400-500, चुका : 300-500, चवळई : 400-500, पालक : 300-500.

Remarks :

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)