पालिका शाळेतील पाल्यांना वृक्ष संवर्धनाचे धडे

सातारा – करंजे पेठेतील पालिका शाळा कलाविहार विद्यामंदिर आणि दीपज्योती विद्यामंदिरच्या विद्यार्थी आणि पालकांना वृक्ष संवर्धनाचे मूल्य सांगून “झाडे लावा, झाडे जगवा’ चा जयघोष नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी नगरसेविका लत्ता पवार, अण्णा लेवे, किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, विशाल जाधव आणि सागर साळुंखे उपस्थित होते. यावेळी पालकांना झाड भेट देत वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा देण्यात आली.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष चळवळ जोमाने वाढवणे आवश्‍यक असून याचा पुढच्या पिढीला लाभ होणार असल्याचे मनोगत नगराध्यक्षा माधवी कदम यांनी व्यक्त केले. शुभ कार्याचे पहिले पाऊल वृक्ष असल्याचे नमूद करताना ग्रामीण भागात मुलांच्या जन्मापासून ते वाढदिवस आणि लग्नाच्यावेळी वृक्ष लागवड करून सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याने वृक्ष लागवडीचे अनुकरण प्रत्येक नागरिकाने करावे, असे आवाहन सौ. कदम यांनी केले. पालिकेच्या या स्तुत्य उपक्रमासाठी प्रमिला मंगल कार्यालयाचे संजय मोरे यांनी कार्यालय उपलब्ध करून दिल्याने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पालिकेचे शिक्षण अधिकारी एम. डी. भांगे, मुख्याध्यापक प्रवीण पवार, मुख्याध्यापक सुनील तुपे, संगीता घनवट, योजना धर्माधिकारी, प्रज्ञा जरग, अजित कोळी आणि नीराबाई कदम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सुत्रसंचालानाला फाटा देत वृक्ष लागवड आणि संगोपनाची सामुहिक प्रतिज्ञा म्हटण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)