पालघरमध्ये खासगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक

पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत एका मतदान केंद्रावरील मतपेट्या खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालघरच्या चिंचरे गावातील 17 नंबरच्या मतदान केंद्रावरील या मतपेट्या होत्या. किराट गावातील काही दक्ष नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला.

याप्रकरणी निवडणूक झोन अधिकारी दीपक खोत आणि मनोहर खांदे यांना नागरिकांनी गाडी अडवून जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणात अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी मतपेट्या वाहून नेण्यासाठी सरकारी वाहने आणि चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे, निवडणूकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र त्याला फाटा दिल्याचे आजच्या घटनेने समोर आले आहे.

बूथ क्र.17 चिंचरेमधील मतपेट्या खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार किराट येथील नागरिकांनी समोर आणला. या मतपेट्या खासगी वाहन क्रमांक एम एच 03 ,बीएस 0980 मधून नेल्या जात होत्या. आधीच मतदानावेळी अनेक ईव्हीएम बंद पडल्याने, निवडणूक प्रक्रियेवरच विरोधकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यातच असे प्रकार घडल्याने, अनेक संशय व्यक्त केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)