पालघरमध्ये एका रात्रीत 82 हजार मतं कशी वाढली: शिवसेना

मुंबई:  पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी एका रात्रीत 6.72 टक्के मते वाढवून सांगितल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’त त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. पालघरमधील मतदान पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि बूथवरील माहिती गोळा केली. त्यानंतर एकूण 46.50 टक्के इतकं मतदान झाल्याचे जाहीर केले.

मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी अचानक पत्रक काढून हे मतदान 53.22 टक्क्यांवर गेल्याचं सांगण्यात आलं. मतदानाच्या आकडेवारीत फार फार तर 1 ते 2 टक्क्यांचा फरक पडू शकतो. मात्र ही सहा टक्के मतं एका रात्रीत कुठून वाढली? असा सवाल करत निवडणूक प्रक्रियेवर शिवसेनेनं संशय व्यक्त केला आहे. सोमवारच्या प्रेसनोटमध्ये  8 लाख 4 हजार 950 मतदारांनी मतदान केल्याचे नमूद करण्यात आले होते, तर मंगळवारी जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये 8 लाख 87 हजार 687 मतदारांनी मतदान केल्याचे प्रसिद्ध केले. याचाच अर्थ एका रात्रीत तब्बल 82 हजार 737 इतके मतदान वाढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोटनिवडणुकीत आधीच मतदानाचा टक्का घसरला आहे. त्यामुळे एक-एक मत निर्णायक असताना एका रात्रीत टक्केवारीचा चमत्कार झाला आणि ती 53.22 वर जाऊन पोहोचली. मतदानाची टक्केवारी रातोरात इतक्या मोठय़ा प्रमाणावर कशी वाढली? ही मते कुणाला तारणार? असे प्रश्न सामनात उपस्थित करण्यात आले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत, पालघरमध्ये 12 तासात 82 हजार मतं वाढली कशी, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे हा EVM चा घोळ आहे, निवडणूक यंत्रणेला हाताशी घेऊन रचलेलं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)