पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगवी – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विभाग प्रमुख व समिती प्रमुखांनी महाविद्यालयात कार्यरत समित्या व विभाग, त्यांची कार्यपद्धती, विधायक उपक्रम याबद्दल माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे होते. यावेळी शिक्षक – पालक – पाल्य संघाची स्थापना करण्यात आली.

पालकांना एन. सी. सी.ची माहिती प्रा. व्ही. ए. नाईकवाडी, एन. एस. एस.ची माहिती प्रा. अमृता इनामदार, खेळाची माहिती प्रा. विद्या पाठारे तर नॅकची माहिती प्रा. मेधा मिसार यांनी दिली. माजी नगरसेवक तसेच माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष राहुल जवळकर, उपप्राचार्य डॉ. शिवाजी ढगे, डॉ. लतेश निकम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर जांभूळकर यांनी केले. प्रास्ताविक महाविद्यालयाच्या पालक मेळाव्याच्या समन्वयक डॉ. नंदा राशीनकर यांनी केले व आभार प्रा. विजय घारे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)