पालकांनो, मुलांशी संवाद साधा ः प्रा.अजित हळींगळे

कडेगाव ः विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. अजित हळींगळे शेजारी मान्यवर.

 

कडेगाव, दि. 28 (प्रतिनिधी) – पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगतीबाबत जागरुक राहणे आवश्‍यक आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी आई-वडिल-गुरुंचा सहभाग महत्त्वाचा असून त्यांनी मुलांशी संवाद साधला गेला पाहिजे, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञ प्रा.अजित हळींगळे यांनी केले.
कडेगाव येथील ‘डोंगराई विकास संस्थेचे’ शेळकबाव हायस्कूल, शेळकबावमध्ये शिक्षक-पालक-विद्यार्थी मेळाव्यानिमित्त आयोजित “शाळा-आई-बाबांची” या अभिनव उपक्रम कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगली मुख्याध्यापक संघाचे सदस्य चंद्रकांत निकम होते. या कार्यशाळेत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पालकांच्या अडचणीचे निवारण करण्यात आले.
प्रा. अजित हळींगळे म्हणाले, जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांवर विविध प्रयोग केले पाहिजेत. मुलांमधील कला, गुणवत्ता शोधली पाहिजे. योग्य मार्ग निवडून मार्गदर्शन केले पाहिजे. मुलांची इतर मुलांशी तुलना न करता विकसित करण्यासाठी पालकांनी सतर्क प्रयत्न करावेत.
चंद्रकांत निकम म्हणाले, ग्रामीण भागातील पालाकांनी विद्यार्थ्यांचे भावी-जीवन चांगले घडविण्यासाठी जागृत राहणे गरजेचे असून शिक्षक-पालकांच्या- सुसंवादातून विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडू शकतील. संगणक युगात संगणकांचा योग्य वापर व्हावा. पालकांनी लहान मुलांना मोबाईल व टिव्ही पासून दूर ठेवून त्यांच्यात योग्य तो विकास साधला पाहिजे. मोबाईलचा दुरुपयोग टाळणे गरजेचे आहे. ‘वाचल तर वाचाल’ म्हणून वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे आहे.
जयवंतराव जाधव म्हणाले, शाळेची शंभर टक्केची परंपरा कायम ठेवा तसेच जागतिक स्पर्धेचा विचार करता विद्यार्थ्यांना कलाधिष्ठीत सर्वगुणसंपन्न, सुसंस्कृत घडवण्यासाठी पालकांनी शिक्षणाविषयी जागृत राहून सहकार्य व योगदान द्यावे.
यावेळी शाळा समितीचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन पोपट चंद्रू कदम, नारायण कदम, हणमंत दाभोळे, राहुल होनमाने, भास्कर कदम, अर्जुन कदम, वसंत तुपे, सतपाल कोळी, बापूसो कदम, सुनील कदम, विलास माळी, सौ. सुनिता कदम, सौ. सुनिता कांबळे, सौ. जयश्री कदम, शिक्षक सुरेश मोहिते, हणमंत घाडगे, राकेश तिरमारे, उत्तम सुपने, राजेश महाडीक, सचिन काळेबाग, दिलीप निकम, संभाजी खवळे, संजय केंगार ,भाऊसो जाधव, पालक, विद्यार्थी- विद्यार्थ्यीनी उपस्थित होते. स्वागत व प्रस्ताविक रमेश माळी तर सुत्रसंचालन महादेव जाधव यांनी केले. अनुमोदन प्रकाश पवार यांनी केले. आभार मिनाक्षी यादव यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)