पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते कोरोना लसीकरणाचा शुभारंभ..

आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी यांच्याशी साधला संवाद

इस्लामपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. आरोग्य कर्मचारी गोरकनाथ चंदणशिवे यांना सिरमची कोव्हीशिल्ड ही पहिली लस देण्यात आली.

पालकमंत्री जयंत पाटील यांनी लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या विभागांची पाहणी केली. तसेच सिरमची कोव्हीशिल्ड या लसीची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय सांळुखे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांच्याकडून जाणून घेतली. ज्या आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी यांना लस देण्यात येणार होती यांच्याशी संवाद साधला.

यावेळी खासदार धैर्यशिल माने, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, इस्लामपूर उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एम. आर. देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विक्रम कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणोजी शिंदे, डॉ. अशोक शेंडे आदी उपस्थित होते.

कोरोनाची प्रथम लस घेणारे क्षयरोग विभागात काम करणारे गोरखनाथ चंदणशिवे म्हणाले,’ रुग्णालयात कार्यरत असताना कोरोनाची लागण झाली होती.त्यामुळे मी आज लस घेतली. कोव्हिशिल्ड ही लस पुर्णपणे सुरक्षीत आहे. मला कोणताही त्रास जाणवला नाही. कोरोना लस घेऊन कोरोना मुक्त व्हावे.”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.