पारदर्शक कारभार असेल तर डगमगण्याचे कारण नाही

मंचर- सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे संस्थांना जीव लावणे गरजेचे आहे. या संस्थावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबुन आहे. त्यामुळे सरकारने कितीही नियम केले तरी संस्थाचा पारदर्शक कारभार असेल तर डगमगण्याचे कारण नाही. मंचर कृषी उत्पन्न समितीचे कामकाज चांगले आहे. प्रामाणिकपणे संस्था चालवुन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न बाजार समितीच्या माध्यमातुन सभापती देवदत्त निकम आणि त्यांचे सहकारी करीत आहेत, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची 15वी वार्षिक सभा रविवारी बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या अध्यक्षतेखाली मंचर बाजार समितीच्या शरद पवार सभागृहात संपन्न झाली. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुषमा शिंदे आदी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीने चांडोली येथे 15 एकर जागेवर बांधकाम करुन शेतकरी, व्यापाऱ्यांना सोयी-सुविधा द्याव्यात असे सांगून वळसे पाटील म्हणाले की, संस्था शेतकरी मालकीच्या आहेत. त्यामुळे संस्थांना जीव लावणे गरजेचे आहे. या संस्थावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबुन आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव एरंडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय मोरे याचीं भाषणे झाली. चर्चेत भाग प्रभाकर बांगर, वनाजी बांगर, के. के. थोरात यांनी घेतला. अहवाल वाचन प्रभारी व्यवस्थापक सचिन बोऱ्हाडे, सूत्रसंचालन दत्ता हगवणे तर आभार उपसभापती संजय शेळके यांनी मानले.

  • तीन पेट्रोलपंप पंपांना मिळाली मान्यता
    यावेळी बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी समितीच्या वतीने तळेघर, लोणी, घोडेगाव येथे तीन पेट्रोलपंप पंप चालु करण्यासाठी मान्यता मिळाल्याचे सांगितले. बाजार समिती स्थापनेपासून प्रथमच यावर्षी चांगली उलाढाल होऊन आर्थिक प्रगती झाली आहे. मोबाईल ऍपद्वारे बाजारभाव आणि वजनाची लगेचच प्रिंट दिली जाणार आहे. त्याची कार्यवाही येत्या पंधरा दिवसात सुरु होईल असे त्यांनी सांगितले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)