पारगाव शिंगवे- आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील मुक्तादेवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्मार्टकार्ड नावनोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन दूध संघाचे संचालक व मुक्तादेवी ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक दौलतराव लोंखडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संघाचे अध्यक्ष किसन ढोबळे, उपाध्यक्ष दिगंबर अस्वारे, खजिनदार नाना ढोबळे, सचिव मदन सांगोलकर आदी उपस्थित होते. परिवहन मंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्डची योजना सुरू केली आहे. पारगाव येथील ज्येष्ठांना नाव नोंदणी करण्यासाठी मंचर व घोडेगाव येथे जावे लागत होते. यासाठी पारगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गावातच स्मार्टकार्ड नावनोंदणी सुविधा उपलब्ध करून दिली.