पारंपरिक पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी

बारामती- शहरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बारामतीतालुका मराठा सेवा संघ जिजाऊ भवनतर्फे शिवजयंती पाळणा म्हणून पारंपरिकपद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी नगराध्यक्षा जयश्री सातव, नामदेव तुपे, नवनाथ बल्लाळ, सत्यव्रत काळे, सचिन सातव, घोडगंगा साखर कारखाना उपाध्यक्ष प्रा. सुभाष कळसकर, धनंजय जामदार, शिवाजी कदम आदी उपस्थित होते. यावेळी जिजाऊ सेवा संघाच्या महिलांनी पाळणा म्हणून व उखाणे घेऊन शिवजन्मोत्सव साजरा केला. मराठा सेवासंघाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मराठी जातीचे दाखले मिळण्यासाठी शिबिर आयोजित केले होते. यावेळी जिजाऊ भवनचे ट्रस्टी यांनी नियोजन केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.