सर्वसामान्यांच्या उपयोगी पडणारा पैसा कमवा

अजित पवार : शिरसवडी येथे पाणीपुरवठा योजनेचे उद्‌घाटन

वाघोली- श्रीमंतांच्या यादीत आपला नंबर असावा, अशी प्रगती करणाऱ्यांनी मिळवलेल्या पैशांतून सामाजिक बांधिलकी जोपासून अनेक उपक्रम राबवून समाज हित जोपासावे हेच समाज हित त्या पैशाची खरी ओळख बनू शकते असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शिरसवडी (ता. हवेली) येथे डोंगरगाव ते शिरसवडी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार अशोक पवार, बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक प्रकाश म्हस्के, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माणिकराव गोते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, हवेली तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती सचिन घुले, हवेली तालुका राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा लोचन शिवले, पंचायत समिती सदस्य संजीवनी कापरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भूमकर, हवेली राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष योगेश शितोळे, अजित भाटे, माजी सरपंच संदीप गोते, पंचायत समिती सदस्य श्‍याम गावडे, माजी सरपंच शिवदास उबाळे, सुभाष टिळेकर, आत्माराम कोतवाल, हिरामण परदेशी, गणेश पुजारी, माजी सरपंच विभीषण नागवडे, हवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य प्रमोद गावडे, प्रमोद गोते, माजी उपसरपंच अंकुश गोते, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव गावडे, संतोष गावडे, सतीश नागवडे, वाडे बोल्हाई चे सरपंच दीपक गावडे, माजी सरपंच कुशाबा गावडे, सुधीर गोते, माजी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर गोते, विजय आवताडे, शिरसवडीच्या सरपंच लता गावडे, उपसरपंच बाळासाहेब गावडे, माजी सरपंच दीप्ती नागवडे, माजी सरपंच मनिषा चितळकर, ग्रामपंचायत सदस्य रमेश कदम, गणेश दगडे, किरण शिंदे, विजय शिंदे, किशोर शिंदे, संजय नागवडे, काळुराम गोते, निवृत्ती झेंडे, भानुदास शेंडगे, नितीन मेमाणे, माऊली थोरात, प्रमोद बोधे, संजय भोसले, अप्पासाहेब काळभोर, सोन्याबापू चौधरी, लालासाहेब बोधे, विकास कानकाटे, अमोल भोसले, मोहन चितळकर, दौलत चितळकर, महादेव चितळकर, धनंजय कदम, राजू मुरकुटे, आणा मुरकुटे, गणेश मुरकुटे, नितीन गावडे, रमेश गावडे, संजय गोते, शिवाजी गोते, विशाल गोते, ग्राम विकास अधिकारी रतन दवणे उपस्थित होते. अशोक पवार, माणिकराव गोते यांनी मनोगते व्यक्त केली. बाळासाहेब गावडे यांनी प्रास्ताविक तर सतीश नागवडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)