पाबळ शाळेत आलेल्या तीन तोतया अधिकाऱ्यांवर गुन्हा

शिक्रापूर- पाबळ (ता. शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेअंतर्गत असलेल्या भैरवनाथ विद्या मंदिर या शाळेमध्ये तीन तोतया अधिकाऱ्यांनी खासदार निधीतील साहित्य आणि बिालाची तपासणीची मागणी केली. याबाबत शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ या संस्थेचे खजिनदार सोपान लक्ष्मण जाधव (रा. पाबळ नागेश्वर चौक, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी तोतया अधिकारी श्रीराम अशोकसिंह परदेशी आणि त्यांच्या दोन साथीदारांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादीनुसार, पाबळ येथील भैरवनाथ विद्या मंदिर येथील शाळेमध्ये शिक्षण संस्थेचे संचालक देवराम जाधव, मुख्याध्यापक कैलास धुमाळ, शिक्षक अविनाश क्षीरसागर, शिपाई सुधीर जगताप हे असताना तीन अनोळखी व्यक्‍ती आले. त्यांनी “आम्ही मंत्रालयातून आलेलो असून आम्हाला तुमच्या शाळेला खासदार निधीतून आलेल्या साहित्यांमध्ये अफरातफर झाले असल्याची माहिती मिळाली आहे, आम्हाला शाळेला आलेले साहित्य दाखवा,’ असे सांगितले. यावेळी शिक्षण संस्थेचे संचालक देवराम जाधव यांनी याबाबत शिक्षण संस्थेचे खजिनदार सोपान जाधव यांना याची माहिती दिली. त्यांनतर सोपान जाधव लगेचच शाळेमध्ये आले. यावेळी आलेल्या तिघांनी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी तोतयांना शाळेला खासदार निधीतून आलेले साहित्य दाखविले. त्यांनी त्यांना त्या साहित्यांच्या बिलाची मागणी केली. त्यावेळी मुख्याध्यापक कैलास धुमाळ यांनी या तिघांवर संशय आल्याने त्यांना त्यांच्या ओळखपत्राची मागणी केली. यावेळी तिघांनी अरेरावी करत तुम्हाला आमचे ओळखपत्र पाहण्याचा काहीही अधिकार नाही, असे म्हणाले. यावेळी त्यातील एकाने त्याचे नाव श्रीराम अशोकसिंह परदेशी असे सांगितले. त्यांनतर त्यांनी बिले पाहत असताना तुमच्या शाळेला खासदार निधीतून आलेल्या साहित्यांची खरेदी बरोबर आहे, असे म्हणाले आणि त्यांनी आणलेल्या (एमएच 14 सीआर 5188) या दुचाकीवरून ते निघून गेले. त्याचवेळी प्राथमिक शाळेतील शिक्षक संतोष जाधव हे त्या ठिकाणी आले. त्यांनी आमच्या शाळेमध्ये तीन अनोळखी व्यक्‍ती आले होते. त्यांनी खासदार निधीतून आलेल्या साहित्यांची पाहणी करून निघून गेल्याचे सांगितले. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)