पाबळला पेट्रोलपंपाच्या रकमेच्या लुटीचा डाव फसला

शिक्रापूर-पाबळ (ता. शिरूर) येथे पेट्रोपपंपाच्या चालकाचा मुलगा व त्याचा साथीदार दोन लाख रुपये रक्कम घेऊन जात असताना रात्रीच्या सुमारास त्याला लुटण्यासाठी दोघे जण दुचाकीवरून आले व रक्कम घेऊन जाणाऱ्या दोघांना पडून त्यांच्याजवळील रकमेची बॅग समजून बूट व कपडे ठेवलेली दुसरीच बॅग घेऊन चोरट्यांनी पोबारा केला असल्याची घटना घडली आहे.
याबाबत अनिकेत सावळेराम नाईक (वय 24, रा. लोणी, ता. आंबेगाव) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत नाईक हा पाबळ येथील पेट्रोलपंपाची दोन लाख रुपये रक्कम त्याचे जवळील एका बॅगमध्ये ठेवून त्याच्या जयेश पंचरास या मित्राला बरोबर घेऊन निघाला. यावेळी जयेश याने त्याच्या बॅगमध्ये पेंटिंग कामाचे कपडे, ब्रश व कपडे ठेवले होते तर अनिकेतच्या एका बॅगमध्ये त्याचा बूट ठेवलेला होता. त्यानंतर दोघे खेडच्या बाजूने जात असताना पाबळपासून खेडच्या रस्त्यावर स्वराज हॉटेलजवळील चढावर अनिकेतची दुचाकी गेली असताना पाठीमागून पाबळ बाजूने दोघेजण आले व त्यांनी अहमदनगरचा रस्ता विचारण्याचा बहाणा करीत त्यांच्याजवळील आणलेले लाकडी दांडके उगारून रक्कम घेऊन चाललेल्या दोघांना दुचाकीवरून खाली पाडले. त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली व त्यांच्याजवळील रकमेची बॅग समजून दोघांजवळील कपडे, बूट ठेवलेली बॅग घेऊन पळून गेले. यावेळी सुदैवाने दोन लाख रक्कम वाचली. याबाबत अनिकेत नाईक यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)