पादचाऱ्याचा मोबाईल लंपास

चिखली – मोबाईलवर बोलत पायी जाणाऱ्या व्यक्तीचा दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने 16 हजार रूपये किंमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून नेला. हा प्रकार नुकताच चिखलीतील साने चौकात घडला.

सेनमील कुमार (वय-39, रा. चिखली) यांनी शुक्रवारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सनी टायसन पिंटो (रा. इंद्रायणीनगर, कामशेत, ता. वडगाव-मावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेनमील कुमार हे 4 एप्रिल रोजी साने चौकातून मोबाईलवर बोलत पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या सनी याने कुमार यांच्या हातातील 16 हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)