पादचारी मार्गावर बेकायदा वाहनतळ

पिंपरी – दुकानदार, फेरीवाल्यांनी जागोजागी पदपथ बळकावले असताना पिंपरी चौक ते पिंपरी स्टेशन या मार्गावर चारचाकी आणि दुचाकीच्या बेकायदा पार्कींगचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे पादचारी मार्ग ही संकल्पनाच धुळीस मिळाली असून नागरीक जीव धोक्‍यात घालून रस्त्यावरून चालत आहेत.

पिंपरी स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. त्यात तिकडेच बाजार भरत असल्याने गर्दीत अजून भर पडते. परंतु, दहा दिवसापूर्वी वायर कनेक्‍शन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पादचारी मार्ग खोदून ठेवला आहे. त्यामुळे खणल्यावरचा निघालेला राडारोडा तसाच पडून असून काढलेले ब्लॉक देखील तसेच पडलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तर स्टेशनपर्यंत असेच चित्र बघायला मिळत आहे.

चौकातच बस थांब्या जवळच ऑटो रिक्षा उभ्या असतात. रिक्षा चालकांची ही वेगळीच धांदल असते. प्रवाशांना बोलाविण्याच्या तंद्रीत रिक्षा सुरू करून तो अर्ध्या रस्त्यात आलेला असतो. तिथेच बससाठी वाट पाहणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते आणि उतरणाऱ्या प्रवाशांची सुद्धा गर्दी असते. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्गावर चारचाकी आणि दोनचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर उभी केलेली आहेत. त्या वाहन चालकांना कोणीच हटकत नसल्याने ते बिनधास्तपणे वाहने उभी करून जातात, असे काही नागरिकांनी सांगितले.

पादचारी मार्गावरच कपड्यांची, गाड्यांचे कव्हर, बॅग, अंगठी आणि थंडपेयाची दुकाने सुद्धा मांडली आहे. त्यामुळे काही नागरिक तेथे खरेदी करायला आल्यावर तो रस्ता पूर्ण गजबजून जातो. त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होतोय. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी तोच मुख्य रस्ता आहे. जवळच महापालिकेची इमारत थोड्याच अंतरावर आहे. रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे सरळ रस्ता देखील नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यातच तो रस्ता नेहमी गजबजलेला असतो त्यामुळे सामान्य नागरिकांना वाट काढणे कठीण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)