पाथर्डी बहुतांशी ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

करंजी, टाकळीमानुर ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर
पाथर्डी – तालुक्‍यात झालेल्या दहा ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी भाजपने सत्ता काबीज केली आहे. राजकीय दृष्ट्‌या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या करंजी व टाकळी मानूर ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन भाजपने सत्ता हस्तगत केली आहे. टाकळीमानुर ग्रामपंचायतीत आमदार मोनिका राजळे समर्थक शुभम गाडे यांच्या पॅनलने एक हाती सत्ता मिळवत राष्ट्रवादीचे गहिनाथ शिरसाठ यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला आहे.एकूण तेरा जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 10 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत गाडे गटांने सर्वच जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. गाडे गटाचे सरपंचपदाच्या उमेदवार वंदना किसवे यांनी 1866 मते घेऊन 807 मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विरोधात असलेल्या कांचन फुंदे यांना 1059 तर तिसऱ्या उमेदवार पार्वती शिरसाठ यांना 320 मते मिळाली.
करंजी येथेही सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रफिक शेख व राजळे समर्थक, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर यांच्यात समोरासमोर लढत झाली. अकोलकर यांनी शेख यांचा मोठ्या फरकाने पराभव करत सत्ता हस्तगत केली. 13 जागांपैकी 8 जागा मिळवण्यात अकोलकर यशस्वी झाले. करंजी, टाकळीमानूर, दगडवाडी, हत्राळ, डांगेवाडी या ग्रा. पं. भाजपच्या ताब्यात आल्या तर साकेगाव व अंबिका नगर येथे शिवसेनेने तर सैदापूर येथे कॉंग्रेसने वर्चस्व मिळवले. करंजी, टाकळीमानूर, हत्राळ, सैदापूर येथे मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिला तर डांगेवाडी, अंबिकानगर, साकेगाव येथील सत्ताधाऱ्यांनी आपले गड पुन्हा एकदा राखले. डांगेवाडी ग्रा. पं. पुन्हा एकदा आपल्याच ताब्यात राखण्यात प.स.चे उपसभापती विष्णुपंत अकोलकर यांना यश आले. या ठिकाणी सरपंच म्हणून छाया सपकाळ या पूर्वीच बिनविरोध म्हणू निवडून आल्या होत्या. साकेगाव ग्रा.पं. आपल्याच ताब्यात राखण्यात शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष अप्पा सातपुते यांनी यश मिळवले. या ठिकाणी सरपंचपदी सुधाकर बळीद हे निवडून आले त्यांना 1134 मते मिळाली तर या निवडणुकीत ग्रा.पं. सदस्य म्हणून सलग तिसऱ्यांदा सातपुते निवडून आले.
अंबिकानगरची ग्रा. पं. पुन्हा एकदा आपल्याच ताब्यात ठेवण्यात शिवसेना नेते बाबासाहेब ढाकणे यांनी यश मिळवले. त्यांच्या पत्नी सत्यभामा ढाकणे हे 438 मते घेऊन सरपंचपदी निवडून आल्या.हत्राळ येथे सत्ताबदल होऊन येथे भीमराव टकले हे सरपंचपदी निवडून आले. त्यांना 326 मते मिळाली.या ठिकाणी ग्रा.पं.सदस्यासाठी उभे राहिलेल्या शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले हे पराभूत झाले. सैदापूर येथे काशिनाथ लवांडे समर्थक आजिनाथ डोंगरे हे 420 मते घेऊन सरपंच म्हणून निवडून आले तर दगडवाडी येथे स्वाती शिंदे 469 मते मिळवून सरपंच म्हणून निवडून आल्या. शंकरवाडी येथे ग्रा.पं.च्या सात पैकी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या तर एक जागा रिक्त राहिली होती. या ठिकाणी सरपंचपदासाठी मात्र चार उमेदवार रिंगणात उभे होते. त्यापैकी अशोक दहातोंडे यांनी 438 मते घेऊन ते सरपंचपदी निवडून आले. रेणुकाईवाडी येथे मुक्ता म्हस्के या सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यांनी 312 मते मिळवली. या निवडणुकीत राष्ट्रवादीला आपले खातेही उघडता आले नाही. विजयी उमेदवारांनी मोठ्या जल्लोषात बालाजी उधळण करत मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला. तहसीलदार नामदेव पाटील व नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्‍यातील दहा गावांचे नागरिक मतमोजणीसाठी तहसील आवारात एकत्र आल्याने तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : टाकळीमानुर- वंदना किसवे सरपंच, सदस्य: श्रीकृष्ण गाडे, शमा शेख, कचराबाई काळे, शिलाबाई ठोंबरे, मधुकर बर्डे, आश्रुबा हंडाळ, शारदा शिंदे, सुनीता पाखरे, नारायण दहिफळे, शितल बांगर, मच्छिंद्र मानकर, सरस्वती सिरसाठ. करंजी- त्रिंबक अकोलकर सरपंच, नवनाथ आरोळे, दयाबाई क्षेत्रे, बाबासाहेब गाडेकर, आशा अकोलकर, रोहित आकोलकर, रुक्‍मिणी अकोलकर, कविता अकोलकर, राहुल अकोलकर, चंद्रकला अकोलकर, सविता दानवे, अमोल आगाशे, प्रशांत अकोलकर, लता हजारे. शंकरवाडी – अशोक दहातोंडे सरपंच, उद्धव गोडसे, गणेश जाधव, सुमन खरपुडे ,विजय नवघरे, सुमन पुंड मंडाबाई नवघरे. साकेगाव- सुधाकर बळीच सरपंच, राजेंद्र सातपुते, रुभा बाई पठारे, द्वारका घुमरे, काकासाहेब सातपुते, रुकसाना शेख, आप्पासाहेब सातपुते, मनीषा दुधाळ, लक्ष्मीबाई सातपुते, संतोष चव्हाण, चंद्रकांत सातपुते, मीरा एकशिंगे.
सैदापुर- आजिनाथ डोंगरे सरपंच, सुखदेव केदार, राधिका कराड, रंगनाथ दराडे, स्वाती केदार, रेवननाथ केदार, सविता केदार, सिंधुबाई केदार. डांगेवाडी- छाया सपकाळ सरपंच, अहिल्याबाई सपकाळ, सोमनाथ अकोलकर, विष्णू डांगे, संगीता डांगे, ज्ञानेश्वर सुरासे, द्वारकाबाई डांगे, सुमन सकुंडे. रेणुकाईवाडी- मुक्ता मस्के सरपंच, अरुण वाबळे, शोभा निंबाळकर, गोपीनाथ म्हस्के, सुरेखा निंबाळकर, बाळासाहेब जाधव, जनाबाई कुऱ्हे, प्रगती कराळे. हत्राळ – भीमराव टकले सरपंच, अंबादास बळीद, विठाबाई साळवे, विनायक काकडे, लता काकडे, भाऊसाहेब टकले, मंकरणा गणेशकर, अंबिका शिवणकर. अंबिकानगर – सत्यभामा ढाकणे सरपंच, दीपक राजगुरू, लीलाबाई धोत्रे, राहुल काळे, मालन फुलमाळी, अशोक शिरसाठ, सुलोचना देठे, साबेरा सय्यद. दगडवाडी- स्वाती शिंदे सरपंच, माई शिंदे ,निर्मला तनपुरे, अशोक शिंदे, गिताबाई काळे, सचिन शिंदे, जालिंदर पवार, आशाबाई शिंदे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)