पाथर्डीत महिलांचा हंडा मोर्चा

नगराध्यक्ष गर्जे यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित

पाथर्डी – नगरपालिका हद्दीतील बोरुडे वस्तीवर नगरपालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी वस्तीवरील महिलांनी हंडा मोर्चा काढला. महिलांचा मोर्चा पालिकेकडे येत असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मृत्यूजय गर्जे यांना समजताच त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पाच दिवसात नवीन पाईपलाईनची काम सुरू करण्याचे आश्‍वासन गर्जे यांनी दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. यावेळी सुरेखा बोरूडे, शिला बोरूडे, शारदा बोरूडे, मनिषा बोरूडे, शैल्ला बोरूडे, अनिता बोरूडे, रोहिणी बोरूडे, रत्नमाला बोरूडे, कुसुम बोरूडे, शोभा बोरूडे, अर्चना बोरूडे आदी महिला यावेळी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील नगरपालिका हद्दीत येणाऱ्या बोरूडे वस्ती, खंडोबा माळ, जुना खेर्डा रस्ता या परिसरात पाण्याची पाईपलाईन खराब झाल्याने नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत नाही. तसेच या पाईपलाईनवर अनेक विभागाचे नळकनेक्‍शन असल्याने सगळ्यात शेवटी येणारे बोरुडे वस्तीला पाणीपुरवठा होत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेली पाण्याची समस्या वेळोवेळी सांगूनही पालिका प्रशासनाकडून सोडवली जात नसल्याने बोरुडे वस्तीवरील महिलांनी एकत्रित पालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

बोरुडे वस्तीवर कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे गेल्या सहा महिन्यांपासून तोंडी व लेखी स्वरुपात पालिका प्रशासनासमोर गाऱ्हाणे मांडत असून सुद्धा पालिका प्रशासन गांभीर्याने विचार करत नाही. तात्पुरत्या स्वरूपात कधीतरी टॅंकर पाठवला जातो. टॅंकरने होणारा पाणीपुरवठा पिण्यास अयोग्य असल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे आंदोलनातील महिलांनी सांगितले. डोक्‍यावर मोकळे पाण्याचे हंडे घेवून बोरुडे वस्तीवरील महिला पालिका कार्यालयाकडे येत असल्याची माहिती नगराध्यक्ष गर्जे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ आंदोलनकर्त्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करत. पाच दिवसांत नवीन पाईपलाईनचे काम सुरू करण्याचे आश्‍वासन दिले. नगराध्यक्षांच्या आश्‍वासनानंतर महिलांनी हंडा मोर्चाचे आंदोलन स्थगित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)